IND vs WI : स्मृती-रिचानंतर राधा यादवचा धमाका, विंडिजवर तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी मात, टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय

| Updated on: Dec 19, 2024 | 11:08 PM

India vs West Indies Women 3rd T20i : स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने विंडीजला तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभूत करत 2-1 फरकाने मालिका जिंकली.

IND vs WI : स्मृती-रिचानंतर राधा यादवचा धमाका, विंडिजवर तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी मात, टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय
Radha Yadav women team india
Image Credit source: bcci women X Account
Follow us on

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 0-3 ने मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने मायदेशातील टी 20i सीरिजमध्ये कमबॅक केलं आहे. वूमन्स टीम इंडियाने डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेला तिसरा आणि अंतिम सामना हा 60 धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियासमोर विंडीजला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 157 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह 2-1 ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. राधा यादव, रिचा घोष आणि स्मृती मंधाना या तिघी टीम इंडियाच्या विजयाच्या नायिका ठरल्या.

विंडीजची बॅटिंग

विंडीजच्या पहिल्या 5 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकीलाही मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं. विंडीजसाठी चिनेल हेन्री हीने सर्वाधिक 43 धावांचं योगदान दिलं. डिआंड्रा डॉटीन हीने 25 धावा जोडल्या. कॅप्टन हेली मॅथ्यूजने 22 रन्स केल्या. शेमाइन कॅम्पबेल हीने 17 तर कियाना जोसेफने 11 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून राधा यादव हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रेणुका ठाकुर सिंह, सजीवन सजना, तितास साधू आणि दीप्ती शर्मा या चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

सामन्यातील पहिला डाव

दरम्यान त्याआधी विंडीजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने या संधीच पूर्ण फायदा घेतला. टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 217 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार स्मृती मंधाना हीने 13 चौकार आणि 1 षटकारासह 77 धावा केल्या. रिचा घोषने 21 बॉलमध्ये 54 रन्स केल्या. जेमिमाह रॉड्रिग्स हीने 39 रन्स केल्या. तर राघवी बिष्टने 31 नाबाद धावा केल्या. तर विंडीजकडून चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

भारताचा मालिका विजय

वूमन्स वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनाबी, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफे फ्लेचर आणि करिश्मा रामहारक.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रघवी बिस्ट, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.