IND vs WI 5th T20 : विंडीजनं भारतासमोर गुडघे टेकले, वेस्ट इंडिज तब्बल 88 धावांनी पराभूत, श्रेयस-हुडाच्या खेळीची चर्चा

| Updated on: Aug 08, 2022 | 7:13 AM

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फिरकीपटूंनी सर्व 10 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मालिका आधीच जिंकलेल्या भारतीय संघानं या सामन्यात चार मोठे बदल केले होते. अधिक जाणून घ्या....

IND vs WI 5th T20 : विंडीजनं भारतासमोर गुडघे टेकले, वेस्ट इंडिज तब्बल 88 धावांनी पराभूत, श्रेयस-हुडाच्या खेळीची चर्चा
विंडीजनं भारतासमोर गुडघे टेकले
Follow us on

नवी दिल्ली : भारताचा वेस्ट इंडिज दौरा आणखी एका शानदार विजयासह संपला. भारतीय क्रिकेट संघाने टी-20 (IND vs WI 5th T20) मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा (IND vs WI) 88 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. यासह टीम इंडियानं मालिका 4-1नं जिंकली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय फिरकीपटूंनी आपलं कौशल्य दाखवलं आणि सर्व 10 विकेट घेत नवीन विक्रम केला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फिरकीपटूंनी सर्व 10 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मालिका आधीच जिंकलेल्या भारतीय संघानं या सामन्यात चार मोठे बदल केले होते. त्यात कर्णधार रोहित शर्मालाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडं कमान सोपवण्यात आली होती. हे बदल करूनही विंडीज संघाला भारताचा पराभव करता आला नाही. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 188 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं टीम इंडियासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आणि सलामी करताना 64 धावा केल्या.

वेस्ट इंडिज तब्बल 88 धावांनी पराभूत

श्रेयस-हुडाची जोरदार खेळी

संघात सलामीसाठी आलेला इशान किशन अपयशी ठरला आणि त्याला केवळ 11 धावा करता आल्या. मात्र, अय्यर (64 धावा, 40 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार) आणि दीपक हुडा (38 धावा, 25 चेंडू) यांनी भक्कम भागीदारी केली. या दोघांनी मिळून 76 धावांची भागीदारी करून भारताला 100 धावांच्या पुढे नेले. श्रेयसनं 30 चेंडूत आठवे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. हुडानेही छोटी पण झटपट खेळी खेळली. मात्र, लागोपाठच्या षटकांत दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले.

बीसीसीआयचं ट्विट

कर्णधार हार्दिक पंड्याने (28 धावा, 16 चेंडू) काही मोठे फटके मारून भारतीय डावाचा वेग कमी होऊ दिला नाही. अखेरीस भारताला जलद फिनिशिंग टच मिळाला नसला तरी संघाने 188 पर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून ओडिअन स्मिथने 3 बळी घेतले.

आठवे टी-20 अर्धशतक

सुरुवातीला धक्के

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं जेसन होल्डरला डावाची सलामी देत ​​सर्वांनाच चकित केले. हार्दिकनं डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (3/15) याच्यासोबत गोलंदाजीची सुरुवात केली आणि ती यशस्वी ठरली. होल्डर अवघ्या तीन चेंडूंत खाते न उघडता बाद झाला. अक्षरनं पॉवरप्लेच्या पाचव्या षटकापर्यंत तीन बळी घेत विंडीजचा डाव खिळखिळा केला. त्यानंतर आठव्या षटकात कुलदीप यादवने (3/12) कर्णधार निकोलस पूरनला बोल्ड केले.

आयसीसीचं ट्विट

बिष्णोई-कुलदीप

अवघ्या 50 धावांत 4 विकेट गमावणाऱ्या विंडीज संघाचा पराभव निश्चित वाटत होता, पण शिमरॉन हेटमायर (56) गोठला होता आणि तो सहजासहजी हार मानत नव्हता. हेटमायरचे आक्रमण सुरूच राहिले आणि अवघ्या 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, दुसऱ्या बाजूने विकेट पडतच होत्या. 12व्या षटकात रवी बिश्नोई (16/4) आणि 13व्या षटकात कुलदीपने 2-2 बळी घेत वेस्ट इंडिजला गुडघे टेकले. अखेर, 16 व्या षटकात संपूर्ण संघ अवघ्या 100 धावांत गारद झाला.