मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील कसोटी आणि वन डे मालिकेनंतक आता टी-20 मालिका सुरू होणार आहे. दोन्ही मालिका टीम इंडियाने जिंकल्या असून आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होईल. पहिला सामना आज म्हणजेच गुरूवारी संध्याकाळी पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला अलर्ट रहावं लागणार आहे. कॅरेबियन संघांमध्ये धोकादायक प्लेअरची एन्ट्री झालीये. या खेळाडूसाठी कर्णधार हार्दिक पंड्याच्या यंगिस्तान संघाला मास्टरप्लॅन करावा लागणार आहे.
वेस्ट इंडिज संघाने टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला होता. यामध्ये रोव्हमन पॉवेल याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संघामध्य वन डे संघाचा कर्णधार शाई होप याचीची निवड करण्याती आलीये. गेल्या वर्षेभरापासून शाई होपने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. पण आता झालेल्या वन डे सामन्यांमध्ये त्याने दमदार फलंदाजी केली होती. कोलकातामध्ये 2022 साली टीम इंडियाविरूद्ध शेवटचा सामना खेळला होता. तर दुसरीकडे वेगवान आणि आक्रमक गोलंदाज ओशेन थॉमसलाही संघात स्थान मिळालं असून टीम इंडियासाठी हो गोलंदाज धोका ठरू शकतो.
रोव्हमन पॉवेल कर्णधार तर काईल मायर्स, निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर बॅटींगची जबाबदारी असणार आहे. आताच झालेल्या मेजर क्रिकेट लीगमध्ये निकोलस पूरन याने लीगच्या फायनल सामन्यामध्ये अवघ्या 55 चेंडूत 137 धावांची धमाकेदार खेळी करत संंघाला विजेतेपद जिंकवून दिलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात पूरन टीम इंडियासाठी धोक्याची घंटा असू शकते.
दरम्यान, येत्या वर्षी म्हणजेच 2024 ला टीम इंडियामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर विंडिजचा संघ तयारी करत आहे. मात्र यंदाच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये कॅरिबियन संघ पात्रता फेरीमध्ये विजय मिळवू शकला नाही याचा फटका म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपसाठी ते पात्र ठरले नाहीत.