मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 4 धावांनी पराभव झाला आहे. या सामन्यामध्ये दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केलं आणि दोघांनीही चमकदार कामगिरी केली. परंतु संघाला काही विजय मिळवून देऊ शकले नाहीत. एक मुकेश कुमार आणि दुसरा तिलक वर्मा हा आहे. दोघांपैकी तिलक वर्मा याने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. कारण बॅटींगला येण्याआधीच त्याने आपली निवड सार्थ ठरवल्याचं दाखवून दिलं. कॅरेबियन संघ बॅटींग करत असताना फिल्डिंगवेळी तिलक वर्मा याने एक अप्रतिम झेल घेतला.
पाहा व्हिडीओ :-
“?? ??????? ???????.”@TilakV9
.
.#INDvWIAdFreeonFanCode #WIvIND pic.twitter.com/1O9KQsBOOx— FanCode (@FanCode) August 3, 2023
टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आठवी ओव्हर टाकत होता. तर वेस्ट इंडिजचा कीपर बॅट्समन जॉन्सन चार्ल्स याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर न झाल्याने कॅच उडाला, त्यावेळी तीन खेळाडू कॅच पकडण्यासाठी धावले.
तिन्ही खेळाडूंपासून चेंडू तसा दूरच होता मात्र तिलक वर्मा याने रनिंग कॅच घेतला. तो जोरात धावत आला आणि कॅच घेत त्याने बॅलन्स करत स्वत:ला सावरलं. रनिंग कॅच तसा अवघड होता परंतु तो चित्यासारखा पळत आला आणि कॅच घेतला.
तिलक वर्मा याने आधी फिल्डिंग आणि त्यानंतर बॅटींगमध्ये आपली चमक दाखवली. तिलक वर्मा याने 22 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. पहिला चेंडू निर्धाव खेळला मात्र पुढील दोन चेंडूंवर त्याने सलग दोन षटकार मारत आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.