मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना डोमिनिकाच्या विंडसर पार्क मैदानात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व दिसून आलं. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत पाठवला. आर. अश्विन पाच गडी बाद करत विंडीजला दणका दिला. तर सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल जोडीने विंडीजच्या गोलंदाजांना घाम काढला. पहिल्या दिवसअखेर रोहित शर्मा नाबाद 30, तर यशस्वी जयस्वाल नाबाद 40 धावांवर खेळत आहे. असं असताना पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक इशान किशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात यष्टीमागून काय काय बोलत होता ते सर्व रेकॉर्ड झालं आहे.
इशान किशनने कसोटीमध्ये पहिल्यांदा यष्टीरक्षण करताना दोन झेल घेतले. पण इशान किशन इतकं करूनही स्टंपमागे गप्प बसेल तर कसं होईल. तो वारंवार गोलंदाजांना प्रेरणा देत होता. तसेच काही खेळाडूंना सूचना देताना दिसला. त्याचबरोबत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना डिवचण्याची संधी सोडली नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ishan Kishan Stump Mic Recording ??????#indiavswestindies #IshanKishan #YashasviJaiswal #ViratKohli? #1STTEST pic.twitter.com/XuVZC8sQKK
— THE BSA NEWS (@BsaNewsOfficial) July 12, 2023
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत इशान किशन काही सूचना करताना ऐकायला येत आहे. विराट कोहली स्लिपला उभा होता आणि यशस्वी जयस्वाल सिली पॉइंटला होता. यावेळी त्यांनी या दोघांना क्षेत्ररक्षणाबाबत काही सूचना केल्या. तसेच विंडीज खेळाडूंना बोलून बोलून चकवा देण्याचा प्रयत्न करत होता.
ऋषभ पंत याचा अपघात झाल्याने कसोटी संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी इतर खेळाडूंवर आली आहे. या जागेसाठी आधी केएल राहुल याला संधी मिळाली होती. मात्र दुखापतीमुळे तो संघातून बाहेर आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत श्रीकर भरत याला संधी मिळाली होती. मात्र फलंदाजीत खास काही करू शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इशान किशनला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट, टॅगनरीन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच, जोमे वॉरिकन.