IND vs WI : बापाने केलं रक्ताचं पाणी, टीम इंडियामध्ये निवड पण बीसीसीआयने अजुनही बसवलंय बेंचवरच, पाहा कोण आहे?

| Updated on: Jun 20, 2023 | 8:50 PM

वेस्ट इंडिजचा यंदाचा दौरा हा खास असणार असून त्यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतिक्षेत एका खेळाडू असून त्याने टीममध्ये जागा मिळवली पण त्याला संघ व्यवस्थापनाने अद्यापही संधी दिलेली नाही.

IND vs WI : बापाने केलं रक्ताचं पाणी, टीम इंडियामध्ये निवड पण बीसीसीआयने अजुनही बसवलंय बेंचवरच, पाहा कोण आहे?
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने होणार आहेत. याआधी टीमने वेस्ट इंडिज दौरा 2019 मध्ये केला होता आणि त्यावेळी सर्व सीरिज ही जिंकल्या होत्या. आताचा दौरा हा खास असणार असून त्यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतिक्षेत एका खेळाडू असून त्याने टीममध्ये जागा मिळवली पण त्याला संघ व्यवस्थापनाने अद्यापही संधी दिलेली नाही.

या युवा खेळाडूला संघाने संधी द्यायला हवी चाहत्यांची इच्छा आहे. कारण या खेळाडूचे वडील रिक्षाचालक असून त्यांनी अत्यंत हालाखिचे दिवसातून आपल्या मुलाला क्रिकेटर बनवलं आहे. आता फक्त त्याला संधी मिळण्याची गरज आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मुकेश कुमार आहे.  गेल्या वर्षी बांगलादेश-A विरुद्ध खेळलेल्या मालिकेत भारत अ संघाकडून खेळला होता. यामध्ये त्याने 2 सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर मुकेश कुमारने आतापर्यंत 39 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 149 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट-ए मध्ये त्याने 24 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत.

मुकेश कुमार याला भारतीय सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं, त्यासाठी त्याने तीनवेळा प्रयत्न केले होते. मात्र त्याला काही यश आलं नाही शेवटी त्याने क्रिकेटमध्ये आपलं शंभर टक्के दिलं. परंतु आता त्याला प्रतिक्षा आहे ती फक्त एका संधीची.

दरम्यान, भारताचा वेस्ट इंडिज दौरा टेस्ट मॅच पासून सुरु होणार आहे. जी 2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची सुरुवात असणार आहे. डोमिनिका मध्ये विंडसर पार्कमध्ये 12-16 जुलै दरम्यान पहिली टेस्ट मॅच होणार आहे, तर 20-24 जुलै दरम्यान त्रिनिदादमध्ये क्वींस पार्क ओवल या ठिकाणी दुसरी टेस्ट मॅच होणार आहे.