नवी दिल्ली : एकदिवसीय मालिकेत भारतीय क्रिकेट संघाकडून लाजिरवाणा क्लीन स्वीप पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडीजनं टी-20 मध्ये पलटवार करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. वेस्ट इंडिजनं (IND VS WI) त्यांचा टी-20 संघ जाहीर केला असून त्यात शिमरॉन हेटमायरलाही (Shimron Hetmyer) स्थान मिळाले आहे. हा डावखुरा फलंदाज वनडे मालिकेत संघाचा भाग नव्हता पण या खेळाडूला टी-20 संघात स्थान मिळाले आहे. वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हेटमायर आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं बोललं जात आहे. निकोलस पूरनकडे (Nicholas Pooran) वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तसेच, हेटमायरचे T20 संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी त्याच्याशिवाय डॉमिनिक ड्रेक्स, ओबेड मॅकॉय, ओडिन स्मिथ यांना टी-20 संघात स्थान मिळाले आहे. हे सर्व खेळाडू टी-20 स्पेशालिस्ट मानले जातात. ज्याने आयपीएल 2022 मध्ये देखील भाग घेतला होता. दरम्यान, शिमरॉन संघात गेल्यानं त्याच्या पत्नीनं आनंदात हुक्का ओढलाय. याची पोस्टही केली आहे.
वेस्ट इंडिज टी-20 संघ : निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शेमराह ब्रूक्स, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मायर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन जे वॉल्मिथ, ओडिन जे वॉल्मी आणि डेव्हॉन थॉमस.
भारतीय संघ टी-20 मालिकेसाठी देखील पूर्णपणे तयार आहे. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेचे नेतृत्व करेल. त्याच्याशिवाय एकदिवसीय मालिकेत विश्रांती घेतलेला हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार हे देखील संघात दिसणार आहेत. अश्विन-कुलदीप यादव यांनीही टी-20 संघात पुनरागमन केले आहे. युझवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली आहे.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षल पटेल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक होडा , रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल.
भारतीय क्रिकेट संघासाठी ही T20 मालिका खूप महत्त्वाची आहे कारण त्यातील अनेक खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत. कर्णधार रोहित शर्माला सलग धावा काढता येत नाहीत. सूर्यकुमार यादवचा फॉर्म गडबडला आहे. पंतने अजून T20 मध्ये स्वतःला सिद्ध करता आलेले नाही आणि आता त्याची बॅटिंग ऑर्डरही दिसत नाहीये. या सर्व प्रश्नांची उत्तरे वेस्ट इंडिजच्या मालिकेत मिळू शकतात.