IND vs WI: धवन-रोहितची जोडी इतिहास रचण्यास सज्ज, सचिन-सौरवसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

| Updated on: Feb 11, 2022 | 11:17 AM

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी, मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपवर असेल.

1 / 4

2 / 4
या सामन्यात सलामीवीर शिखर धवनचे संघात पुनरागमन होणार आहे, जो कोरोनामुळे आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मैदानात उतरु शकला नव्हता. आता तो रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून मैदानात उतरताना दिसणार आहे. या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात या दोघांना खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.

3 / 4
रोहित आणि शिखर धवन सलामीची जोडी म्हणून 5000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहेत. तिसर्‍या वनडेत अवघ्या 22 धावांची भागीदारी करताच रोहित-धवन दोघेही ही विशेष कामगिरी पूर्ण करतील.

4 / 4
5000 धावा पूर्ण करणारी ही भारताची दुसरी सलामीवीर जोडी असेल. त्यांच्या आधी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली या जोडीने हा पराक्रम केला आहे. या जोडीने सलामीवीर म्हणून 6,609 धावा फटकावल्या आहेत.