Video : IND vs WI | दुसऱ्या कसोटीमध्येही अजिंक्य रहाणे पुन्हा फेल, झाला क्लीन बोल्ड

| Updated on: Jul 21, 2023 | 2:43 PM

Ajinkya Rahane Out : रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी झकास सुरूवात केली होती. दुसऱ्या सामन्यामध्येही टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे परत एकदा फेल गेला आहे. 

Video : IND vs WI | दुसऱ्या कसोटीमध्येही अजिंक्य रहाणे पुन्हा फेल, झाला क्लीन बोल्ड
Follow us on

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडिया बॅकफूटला गेली आहे. पहिल्या सेशनमध्ये एकही गडी भारताने गमावला नव्हता मात्र दुसऱ्या सेशनमध्ये कॅरेबियन गोलंदाजांनी कमबॅक केलं आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी झकास सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यामध्येही टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे परत एकदा फेल गेला आहे.

अजिंक्य रहाणे अवघ्या 8 धावा करून परतला, त्याला शॅनन गॅब्रिएलने बोल्ड केलं. मागील सामन्यातही रहाणे लवकर परतला होता, त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीमधील पहिल्या डावातही त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

सामन्याचा धावता आढावा:-

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी पहिल्यांदा उतरलेल्या टीम इंडियाने झकास सुरूवात केली होती. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी शतकी भागीदारी केली होती. पहिल्या सेशनमध्ये एकही विकेट भारताने गमावली नाही मात्र दुसऱ्या सेशनमध्ये चार विकेट गमावल्या.

पहिला विकेट 139 धावांवर गेली, यशस्वी जयस्वाल 57 धावा, रोहित शर्मा 80 धावा, शुबमन गिल 10 धावा, अजिंक्य रहाणे 08 धावांवर माघारी परतले. मैदानात आता कोहली आणि जडेजा फलंदाजी करत आहेत. विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे.

 

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (W), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (W), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज