WI vs IND : अजिंक्य रहाणे याने घेतला सुपरमॅनसारखा कॅच, रोहित-कोहली शॉक, Video व्हायरल

| Updated on: Jul 24, 2023 | 7:09 PM

वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामधील चौथ्या दिवशी टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane Catch) याने घेतलेला जबरदस्त कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

WI vs IND : अजिंक्य रहाणे याने घेतला सुपरमॅनसारखा कॅच, रोहित-कोहली शॉक, Video व्हायरल
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरूद्धच्या (INDvsWI 2 Test Match) दुसऱ्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी कॅरेबियन संघाला 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला (Team India) आठ विकेट्स घ्यायच्या आहेत त्यामुळे कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane Catch) याने घेतलेला जबरदस्त कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:-

 

वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावामध्ये हा झेल घेतला गेला आहे.  जर्मेन ब्लॅकवुड याने मैदानामध्ये आपले पाय भक्कमपे रोवले होते. 90 चेंडू खेळत त्याने एक बाजू चांगली लावून धरली होती मात्र रविंद्र जडेजाच्या एका चेंडूवर तो फसला.

रविंद्र जडेजा याला विकेट मिळाली पण खरी विकेट रहाणेच्या नावावर आहे. कारण पठ्ठ्याने तसा जबरी कॅच घेतला. बॅटींगमध्ये अपयशी ठरलेल्या रहाणेने फिल्डिंगमध्ये आपली जादू दाखवून दिली आहे. रहाणेने घेतलेल्या झेलचा सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.