मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजविरूद्धचा दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच गुरूवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाचा मानहानिकारक पराभव झाला होता. एक डाव आणि 144 धावांनी टीम इंडियाने धूळ चारली होती. आता दुसरा आणि अंतिम सामना जिंकण्यासाठी संघात मोठा बदल केला आहे. वेस्ट इंडिजने जाहीर केलेल्या प्लेइंग 11 मध्ये एका स्टार खेळाडूची एँन्ट्री झाली आहे.
विंडिजने दुसऱ्या कसोटीसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तर 2 राखीव खेळाडूंचा समावेश केलाय. विंडिजने टीममध्ये एकमेव बदल करण्यात आलाय. विंडिजने दुसऱ्या कसोटीसाठी केविन सिंक्लेयर याला टीममध्ये घेतलंय. केविनची टीममध्ये संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरलीय. वेस्ट इंडिजने संघ जाहीर केला आहे मात्र टीम इंडियाने अजून काही प्लेइंग 11 ची घोषणा केलेली नाही.
दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये बदल होऊ शकतो. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, संघामध्ये दोन खेळाडू असे आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये अजून संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना संधी म्हणून आम्ही मैदानामध्ये उतरवू शकतो.
क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), अलिक अथानाझे, टॅगेनरीन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमर रोच, केविन सिंक्लेअर आणि जोमेल वॅरिकन.
राखीव खेळाडू – टेविन इम्लाच आणि अकीम जॉर्डन.
भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (w), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड, श्रीकर भारत, अक्षर पटेल , नवदीप सैनी, मुकेश कुमार