मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. हा मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी वेस्ट इंडिजसाठी दुसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या पंचांकडून मोठी चूक घडल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. डीआरएस रिप्ले चूक घडल्याने मैदानात तग धरलेल्या रवींद्र जडेजाला तंबूत जावं लागलं.
पहिल्या डावातील दुसऱ्या दिवशी 104 वं षटक सुरु होतं. विडींजचा वेगवान गोलंदाज केमार रोज याने ऑफ स्टंप बाहेर चेंडू टाकला. हा चेंडू मारताना रवींद्र जडेजा चुकला आणि चेंडू थेट ग्लोव्ह विकेटकीपरच्या हाती गेला. यामुळे जोरदार अपील करण्यात आली. पंचांनी नाबाद दिलं. पण विंडीज कर्णधाराने रिव्ह्यू घेतला.
रिव्ह्यू पाहताना असं दिसलं की चेंडू बॅटच्या जवळून गेला. तसेच स्नीकोमीटरमध्ये याबाबतची नोंद झाली. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी निर्णय बदलण्यास सांगितलं आणि त्याला बाद घोषित करण्यात आलं.
पहिल्यांदा रवींद्र जडेजा हा बाद असल्याचं सगळ्यांना दिसलं. पण थोड्याच वेळात समालोचकाने याबाबत मोठा खुलासा केला. त्याने मॅचच्या ब्रॉडकास्टरने डीआरएसमध्ये जुना शॉट रिप्ले केल्याचं सांगितलं. त्यामुळे स्नीकोमीटरवर त्याची नोंद झाली.हा चेंडू बॅटला आदळला नव्हता, तर बॅट पॅडला लागल्याचं आवाज होता, असं सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली.
DRS scam 2023. Jadeja's wicket was robbed. @ICC @BCCI @imjadeja @imVkohli pic.twitter.com/FAbXKihW0S
— Human_Insaan?? (@Alishan_53) July 21, 2023
खरं तर रवींद्र जडेजा आऊटच होता. जसं समालोचकाने याबाबत सांगितलं तेव्हा खरा रिप्ले चालवला गेला. यात चेंडू जडेजाच्या बॅटला लागल्याचं स्पष्ट झालं आणि तो आऊटच होता. रवींद्र जडेजाने 5 चौकाराच्या मदतीने 152 चेंडूत 61 धावा केल्या.