IND vs WI Test : 500 व्या सामन्यात विराट कोहली करणार असं काही, बॅटिंग कोचच्या भाकिताने एकच चर्चा

| Updated on: Jul 17, 2023 | 3:31 PM

विराट कोहली याला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. आशिया कप स्पर्धेपासून विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. पण अजून कसोटीत हवी तशी खेळी झालेली नाही.

IND vs WI Test : 500 व्या सामन्यात विराट कोहली करणार असं काही, बॅटिंग कोचच्या भाकिताने एकच चर्चा
IND vs WI Test: विराट कोहली 500 व्या सामन्यात साधणार मुहूर्त, फलंदाज प्रशिक्षकांनीही स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

मुंबई : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 182 चेंडूंचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. मात्र विराटला पुन्हा एकदा शतक ठोकण्यात अपयश आल्याची चर्चा रंगली आहे. खरं तर विदेशात विराट कोहलीला शेवटचं शतक झळकावून 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 123 धावा केल्या होत्या. मात्र तेव्हापासून आतापर्यंत विदेशात शतकी खेळण्यात अपयश आलं आहे. 20 जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतला 500 वा सामना आहे आणि या सामन्यात विराट कोहली शतक करेल, असं भाकीत बॅटिंग कोच विक्रम राठोड याने केलं आहे.

विराट कोहली करेल शतक

विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्यात अपयश आल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला होता. त्याचबरोबर सावध खेळी पाहून अनेकांनी त्यांच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विराटला 80 चेंडूनंतर चौकार मारण्यात यश आलं होतं. असं असूनही बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी विराटची बाजू मांडली आहे. “कोहलीने कठीण प्रसंगात फलंदाजी केली. लवकरच विराट कोहली शतक करेल.”, असं विक्रम राठोड यांनी सांगितलं.

कोहलीने बॅटिंग स्टाईल बदलली!

“विराट कोहलीने परिस्थितीनुसार आपल्या फलंदाजी बदल केला आहे. संघाच्या आवश्यकतेनुसार विराट कोहलीने स्टाईल बदलली आहे. असं करणं एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. त्याच्या फलंदाजीवेळी खेळपट्टी खूपच टर्न होत होती. अशा स्थितीत फलंदाजी करणं तरुणांसाठी धडा आहे.”, असं विराट कोहली याने सांगितलं.

विराट कोहलीचा 500 आंतरराष्ट्रीय सामना

विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. विराटने 110 कसोटी सामने खेळले आहेत. यात 28 शतकं, 7 द्विशतकं आणि 29 अर्धशतकं झळकावली आहेत. तर 274 वनडे समन्यात विराटने 46 शतकं आमि 65 अर्धशतकं झळकावली आहेत. 115 टी20 साम्यात विराटने 1 शतक आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.