मुंबई : वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यात भारताला (India) दोन मोठे झटके बसले आहेत. संघातील 2 स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर गेले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय वेस्ट इंडिजमध्ये येणाऱ्या भारतीय संघाला यापुढे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुलची (KL rahul) साथ मिळणार नाही. खरे तर दोघेही संपूर्ण मालिकेतून बाहेर गेले आहेत. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी जडेजाला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी केएल राहुलला कोरोना झाला असून तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता अशा खेळाडूंच्या गळतीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे.
केएल राहुलला कोरोना झाला असून तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. तथापि, केएल राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नव्हता. त्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली असली तरी टी-20 मालिकेतील तो महत्त्वाचा भाग होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, जी 29 जुलैपासून सुरू होणार आहे. राहुल या आठवड्यात वेस्ट इंडिजला रवाना होणार होता, मात्र आता तो टी-20 मालिकेतून बाहेर पडल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी राहुल जखमी झाला होता. त्यानंतर तो शस्त्रक्रियेसाठी जर्मनीलाही गेला होता. राहुलने काही दिवस एनसीएमध्ये नेटमध्ये फलंदाजीचा सरावही केला होता, मात्र आता त्याच्या दुखापतीच्या बातमीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे
क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषक पाहता बीसीसीआयला धोका पत्करायचा नाही, त्यामुळे जडेजाला संपूर्ण वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत आणखी वाढू नये. संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाला विश्रांती दिल्यास तो 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकतो.
दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खुलासा केला आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन पूर्ण करत असलेल्या केएल राहुलची चाचणी सकारात्मक आली आहे आणि तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच T20 मालिकेत भाग घेण्याची शक्यता नाही. केएल राहुलवर नुकतीच जर्मनीत हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. फिटनेस मिळविण्यासाठी तो सध्या एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे.