वूमन्स टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात गुरुवारी 19 डिसेंबरला तिसऱ्या टी 20 सामन्यात विंडीजवर 60 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. वूमन्स टीम इंडियाने मायदेशात 5 वर्षांनंतर टी 20I मालिका जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघांमध्ये होणाऱ्या या एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तिन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहे.
हरमनप्रीत कौर ही भारताचं नेतृत्व करणार आहे. हरमनप्रीतला दुखापतीमुळे टी 20I मालिकेत खेळता आलं नाही. हरमनप्रीत दुखापतीतून सावरली नसेल तर पुन्हा एकदा स्मृती कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. तर हेली मॅथ्यूजच्या खांद्यावर विंडीजच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. आपण पहिल्या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
इंडिया विरुद्ध विंडीज पहिला एकदिवसीय सामना रविवारी 22 डिसेंबरला होणार आहे.
इंडिया विरुद्ध विंडीज पहिला एकदिवसीय सामना कोंतबी स्टेडियम, बडोदा येथे होणार आहे.
इंडिया विरुद्ध विंडीज पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
इंडिया विरुद्ध विंडीज पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंडिया विरुद्ध विंडीज पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मानधना, उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, मिन्नू मणी, तेजल हसबनीस, प्रतिका रावल आणि हर्लीन देओल.
वेस्ट इंडिज वूमन्स टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), कियाना जोसेफ, डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, आलिया ॲलेने, शबिका गजनबी, झैदा जेम्स, एफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, मानसरा विल्यम, रशादा, मानगुरु अश्मिनी मुनिसार आणि शमिलिया कोनेल.