IND vs WI : वेस्ट इंडिजला पोहोचताच यशस्वी जयस्वाल हॉटेलमधून झाला गायब, असं झालं सर्व उघड

| Updated on: Jul 12, 2023 | 9:45 PM

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात खेळण्याची संधी यशस्वी जयस्वाल याला मिळाली आहे. पण बारबाडोसमधील हॉटेलमधून यशस्वी गायब झाला होता.

IND vs WI : वेस्ट इंडिजला पोहोचताच यशस्वी जयस्वाल हॉटेलमधून झाला गायब, असं झालं सर्व उघड
IND vs WI : यशस्वी जयस्वाल हॉटेलमध्ये पोहोचताच कुठे गेला? असा झाला खुलासा
Follow us on

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आर. अश्विनच्या फिरकीपुढे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. तर दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन कसोटीत डेब्यु करत आहेत. या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. यशस्वी या सामन्यात कशी फलंदाजी करतो यावर त्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. यशस्वी जयस्वाल याने आतापर्यंत सर्वांचं लक्ष आपल्या फलंदाजीने वेधून घेतलं आहे. दुसरीकडे या दौऱ्यात त्याची पहिली नजर कशावर पडली याचाही खुलासा झाला आहे.

कुठे गेला होता यशस्वी जयस्वाल

दोन सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये आहे. 21 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याचा पहिला कॅरेबियन दौरा आहे. त्यामुळे तो चांगलाच उत्साहित आहे. पहिल्यांदा भारतीय संघ बारबाडोस येथे पोहोचला. तेव्हा यशस्वी जयस्वाल याने समुद्रकिनारी जाऊन एक फोटो घेण्याचं काम पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड याने एका व्हिडीओतून हा खुलासा केला आहे.

बीसीसीआयच्या नव्या पॉडकॉस्ट सीरिजच्या पहिल्या भागात ऋतुराज गायकवाड याने सांगितलं की, “बारबाडोसला पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी यशस्वी जयस्वालला तिथे पाहिलं.” त्यानंतर ऋतुराज गायकवाडने यामागचं कारण विचारलं.

यशस्वी जयस्वाल याने सांगितलं की, “खूप लांबच्या प्रवासामुले थकवा आला होता. तसेच जेटलॅगने त्रस्त होतो. यासाठी पहिल्या रात्री झोपच आली नाही. त्यामुळे सकाळी सकाळी समुद्र किनारी आलो. तिथे सुंदर इंद्रधनुष्य नजरेस पडले. त्यावेळी इंद्रधनुष्यासोबत सेल्फी घेतला.”

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट, टॅगनरीन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच, जोमे वॉरिकन.