ind vs zim 2nd T20 : हा तर युवराज सिंह निघाला, सामना संपल्यावर शतकवीर अभिषेक शर्मा म्हणाला…

| Updated on: Jul 07, 2024 | 11:18 PM

ind vs zim : झिम्बाब्वेविरूद्ध वादळी शतकी खेळी करणाचा टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली. युवराज सिंहचा शिष्य असलेल्या अभिषेकला पहिल्या सामन्यातील पराभव जड गेला होता. त्यानंतर त्याने आपल्या बॅटमधून सर्वांना उत्तर दिलं.

ind vs zim 2nd T20 : हा तर युवराज सिंह निघाला, सामना संपल्यावर शतकवीर अभिषेक शर्मा म्हणाला...
Follow us on

दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 100 धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 234-2 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करतान झिम्बाब्वेचा संघाचा डाव 134 वर आटोपला. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवर अभिषेक शर्मा याने वादळी शतक करत गोलंदाजांचा खरपूस समचार घेतला. पहिल्या सामन्यात शून्यावर आऊट झाल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. मात्र त्याने आज 100 धावांची खेळी करत सर्वांना उत्तर दिलं. या सामन्यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.

मला वाटते की ही माझ्याकडून चांगली कामगिरी केली. काल आमच्या टीमचा पराभव झाला तो आमच्यासाठी सोपा नव्हता. मला वाटलं आज माझा दिवस आहे आणि त्याचा गोष्टीची पूरेपर फायदा घेतला. टी-२० क्रिकेटमध्ये लय राखावी लागते आणि मी ती शेवटपर्यंत ठेवली. युवा खेळाडू म्हणून मला वाटतं की जर तुमचा दिवस असेल तर तुम्ही मोकळंहून खेळायला हवं. माझ्या एकद्या टप्प्यात बॉल आला की तो पहिला असला तरीसुद्धा तो मारणार, असं अभिषेक शर्मा म्हणाला.

 

अभिषेक शर्माने 47 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले. या खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत . झिम्बाब्वेमध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी एकाही भारताच्या खेळाडूल ही कामगिरी करता आलेली नव्हती. सर्वात कमी डावात T20 शतके करणारा अभिषेक शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अभिषेक शर्माने दुसऱ्याच सामन्यात शतक केलं आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा