टीम इंंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये आज तिसरा टी-20 सामना होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचे युवा शिलेदार परत एकदा मोठ्या विजयासाठी उत्सुक आहेत. दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी शतक केलं होतं. आजच्या सामन्यात टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या टीमची तुम्हाला मदत होऊ शकते.
कर्णधार : अभिषेक शर्मा
उपकर्णधार: ब्लेसिंग मुजरबानी
विकेटकीपर: क्लाइव मदंडे, संजू सॅमसन
बॅट्समन: शुबमन गिल , ऋतुराज गायकवाड़, वेस्ली मधेवेरे
ऑल राउंडर: सिकंदर रजा , वॉशिंगटन सुंदर, अभिषेक शर्मा
बॉलर: रवि बिश्नोई, ब्लेसिंग मुजरबानी, मुकेश कुमार
टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील तिसरा टी-20 सामना बुधवारी दुपारी चार वाजता होणार आहे. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा यालाच कॅप्टन करा, कारण अभिषेकचा फॉर्म पाहता आजही तो मोठी खेळी करू शकतो. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल झाला तर विकेटकीपर संजू सॅमसन याला आज संघात जागा मिळू शकते. संजू संघात आल्यामुळे ध्रुव जुरेल याला बाहेर बसावं लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला विकेटकीपर म्हणून स्थान देऊ शकता.
टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात दोन्ही टीमने एक विजय मिळवला आहे. त्यामुळे ही मालिका आता 1-1 ने बरेबरीत आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने सरशी साधणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रिंकू सिंग, शिवम दुबे, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई.