यशस्वी जयस्वालची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली होती. मात्र एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धा त्याने बेंचवर बसून काढली. पण ही संपूर्ण कसर झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भरून काढण्याचा त्याने प्रयत्न केला. आत्मविश्वासाने भरलेल्या यशस्वी जयस्वालने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सुरुवातीला सळो की पळो करून सोडलं. त्याला कर्णधार शुबमन गिलची उत्तम साथ लाभली. पॉवर प्लेच्या 6 षटकात या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. यात यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांच्या प्रत्येकी 27 धावा होत्या. यशस्वी जयस्वाल शुबमन गिलसोबत ओपनिंगला उतरला आणि स्ट्राईक घेतली. पहिल्याच षटकातील दोन चेंडू निर्धाव घालवल्यानंतर आक्रमक प्रहार सुरु केला. दोन चौकार आणि एक षटकार मारला. शुबमन गिलने सुरुवात जबरदस्त केली. मात्र नंतर त्याच्या स्ट्राईक रेट कमी झाला. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. अर्धशतकी खेळी करेल असं त्याच्या चाहत्यांना वाटत होतं. पण सिकंदर रझाच्या जाळ्यात अडकला आणि विकेट देऊन बसला.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बेंचवर बसलेल्या यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनची निवड झाली. तसेच शिवम दुबेलाही या संघात स्थान मिळालं आहे. असं असताना या तिघांसाठी प्लेइंग 11 मध्ये जागा करताना चांगलीच दमछाक झाली. अखेर रियान पराग, ध्रुव जुरेल यांना बसवण्याचा निर्णय घेतला. तर साई सुदर्शन तिसऱ्या सामन्यापासून संघाचा भाग नसल्याने एक जागा रिकामी झाली होती. शुबमन गिलच्या नेतृत्वात एक तगडा संघ मैदानात उतरला आहे हे मात्र नक्की. आयपीएलमध्ये या दिग्गज खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे एक पाठोपाठ एक दिग्ग फलंदाज असल्याने विकेट गेली तरी टेन्शन नाही असंच दिसतंय.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा