टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील T20 मालिका आजपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली या मोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया पहिलाच सामना खेळणार आहे. टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. आज दोन्ही संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा संघ मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम ११ लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4.30 वाजता होणार आहे. या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. या सामन्यात युवा खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल. रिंकू सिंग, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांच्याकडे फलंदाजाची जबाबदारी आहे. तर मुकेश कुमार, तुषार देशपांडे हर्षित राणा यांच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
यष्टिरक्षक- ध्रुव जुरेल
फलंदाज- रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, बी साई सुदर्शन
अष्टपैलू- सिकंदर रझा, अभिषेक शर्मा, रियान पराग
गोलंदाज- रिचर्ड नागरावा, तुषार देशपांडे, रवी बिश्नोई आणि आवेश खान
कर्णधार- अभिषेक शर्मा
उपकर्णधार- रुतुराज गायकवाड
भारताचा संघ-:
शुबमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.
झिम्बाब्वे संघ:
सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट केया, क्लाइव्ह एम, वेस्ली मेदवेरे, टी मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा, ब्रेंडन मावुता, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्स, अंतम नकवी, रिचर्ड नकवी , मिल्टन शुम्बा.