टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. या मालिकेचं नेतृत्व शुबमन गिलकडे असून संपूर्ण संघ नवखा आहे. या संघाकडून भविष्याच्या दृष्टीकोनातून बऱ्याच अपेक्षा आहेत. झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकून विक्रम करण्याची संधी देखील आहे. भारताने आतापर्यंत सलग 12 सामने जिंकले आहेत. अजून 1 सामना जिंकला तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल. कसोटी खेळणाऱ्या संघात भारताला मानाचं स्थान मिळणार आहे. तर दुसरा टी20 सामना जिंकला तर सर्वच पातळींवर भारतीय संघाचा गौरव होईल. दरम्यान शुबमन गिलच्या नेतृत्वात जवळपास संपूर्ण संघच नवा असणार आहे. त्यामुळे झिम्बाब्वे हा संघ दुबळा असला तरी भारताची कसोटी लागणार आहे. पाच सामन्यांसाठी झिम्बाब्वेदेखील सज्ज झाली आहे. झिम्बाब्वेला कमी लेखनं महागात पडू शकतं. झिम्बाब्वेने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्य रहाणे कर्णधार असताना पराभूत केलं आहे. या दोन्ही संघात एकूण 8 सामने झाले. त्यापैकी 6 सामन्यात भारताने तर 2 सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकून शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शुबमन गिलने सांगितलं की, “आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मला वाटते की ते एक चांगली खेळपट्टी दिसत आहे. नंतर फारसा बदल होणार नाही.आम्ही 11 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली. तुमच्याकडून नेहमी काही अपेक्षा असतात. आमच्याकडे तीन नवोदित खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग पदार्पण करत आहेत.”
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने सांगितलं की, “प्रथम फलंदाजी करायला माझी हरकत नाही. विकेट चांगली दिसते. या संक्रमणाच्या टप्प्यात झिम्बाब्वे क्रिकेटने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी तरुण खेळाडूंसह लढण्यासाठी सज्ज आहे. या संघाचं नेतृत्व करणे अभिमानस्पद आहे आहे. सीन निवृत्त झाला आहे. त्यामुळे हा संपूर्ण तरुण संघ आहे. भविष्यात एर्विनची भूमिका असेल.”
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद