IND vs ZIM : दुसऱ्या सामन्यात शुबमन गिल फूसsss! मुझराबानीच्या जाळ्यात असा अडकला

| Updated on: Jul 07, 2024 | 5:04 PM

झिम्बाब्वे दौऱ्यात कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर दिली आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून शुबमन गिलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. त्यामुळेच टी20 वर्ल्डकपमध्ये त्याची निवड राखीव खेळाडूंमध्ये केली होती. पण झिम्बाब्वे दौऱ्यातही काही खास करताना दिसत नाही.

IND vs ZIM : दुसऱ्या सामन्यात शुबमन गिल फूसsss! मुझराबानीच्या जाळ्यात असा अडकला
Follow us on

भारत आणि झिम्बाब्वे यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल याच्यावर मालिकेत बरोबरी साधण्याचं दडपण आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर त्याने पहिल्या सामन्यातील काही चुका दुरूस्त केल्या. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करत खलील अहमदऐवजी साई सुदर्शन याला संधी दिली. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. अपेक्षेप्रमाणे टीम इंडिया सुरुवात करेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. कर्णधार शुबमन गिलने दुसऱ्यात षटकात नांगी टाकली. पहिल्या षटकात दोन धावा घेतल्यानंतर दुसऱ्या षटकात सावध फलंदाजी करताना फसला आणि विकेट देऊन बसला.

संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी मुझाराबानी आला होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलने पॉइंटच्या दिशेने टॅप केला. मात्र त्यावर धाव घेता आली नाही. पण दुसऱ्या चेंडूवर नको करून बसला. मिड ऑनच्या वरून चेंडू मारण्याच्या प्रयत्न फसला आणि थेट ब्रायनेच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही शुबमन गिलला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. पहिल्या सामन्यात शुबमन गिलने 29 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. यात 5 चौकारांचा समावेश होता. मात्र 13 धावांनी पराभव झाल्यानंतर शुबमन गिलने सांगितलं की, मी टिकलो असतो तर कदाचित निकाल वेगळा असता. पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या सामन्यातही टिकला नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा