IND vs ZIM : झिम्बाब्वेने भारतासमोर ठेवलं 116 धावांचं आव्हान, आता टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष

| Updated on: Jul 06, 2024 | 6:17 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु असून त्यातील पहिला सामना सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी 116 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

IND vs ZIM : झिम्बाब्वेने भारतासमोर ठेवलं 116 धावांचं आव्हान, आता टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष
Image Credit source: BCCI
Follow us on

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी20 सामना हरारे येथे सुरु आहे. झिम्बाब्वाने 20 षटकात 9 गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 116 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार शुबमन गिल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात झिम्बाब्वेने सावध सुरुवात केली. खलील अहमदच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा काढल्या. मात्र दुसऱ्या षटकापासून झिम्बाब्वेच्या फलंदाजीला ग्रहण लागलं. मुकेश कुमारने पहिल्याच चेंडूवर कैयाचा त्रिफळा उडवला. त्यामुळे झिम्बाब्वे बॅकफूट आली होती. मात्र वेस्ली मधेवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 34 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात रवि बिष्णोई याला यश आलं. वेस्लीला 21 धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असताना कर्णधार सिंकदर रझा याने डिऑन मायर्ससोबत प्रयत्न केला. मात्र ही जोडी फार काळ टिकू शकली नाही. सिकंदर रझा अवग्या 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या जोनाथन कॅम्पबेल याला खातंही खोलता आलं नाही. धावचीत होत तंबूत परतला.

वॉशिंग्टन सुंदरने डिऑन मायर्सला 23 धावांवर असताना बाद केलं. तर वेलिंग्टन मसकडझा याला आपलं खातंही खोलता आलं नाही. ध्रुव जुरेलने संधीचं सोनं केलं आणि वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर त्याला यष्टीचीत केलं. ब्लेसिंग मुझाराबानी आणि ल्यूक जोंगवेही काही खास करू शकले नाहीत. पण क्लाइव्ह मदांडेने मात्र घाम काढला. एक विकेट शिल्लक असताना चांगल्या धावा केल्या आणि संघाला 100 धावांच्या पार नेलं. क्लाईव्हने 25 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून रवि बिष्णोईने सर्वोत्तम स्पेल टाकला. चार षटकात दोन षटकं ही निर्धाव टाकली. तसेच 13 धावा देत 4 गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद