नवी दिल्ली : झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) 3 एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियानं संघ (Indian Cricket Team) जाहीर केलाय. भारतानं झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची ही घोषणा केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी हे देखील संघात नाहीत. धवननं अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि कॅरेबियन भूमीवर प्रथमच वनडेमध्ये 3-0 असा क्लीन स्वीप केला. झिम्बाब्वेविरुद्ध भारताला चांगलीच तयारी करावी लागणार आहे. यासाठी सज्ज रहावं लागणार आहे. कारण, दिग्गज क्रिकेटपटूची फळी यावेळी नसणार आहे. याविषयी अधिक जाणून घ्या..
#TeamIndia for 3 ODIs against Zimbabwe: Shikhar Dhawan (Capt), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Rahul Tripathi, Ishan Kishan (wk), Sanju Samson (wk), Washington Sundar, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Deepak Chahar.
हे सुद्धा वाचा— BCCI (@BCCI) July 30, 2022
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज दीपक चहरचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएल 2022 मध्ये तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. त्यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केलं आहे. भारताला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
भारताचा एकदिवसीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केलं आहे. भारताला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.