भारत झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाली म्हणून सिकंदर रझा खूश होता. मात्र शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल पहिल्या सामन्यातील सर्व चुका चौथ्या सामन्यात दुरूस्त केल्या. यावेळी यशस्वी जयस्वालने जोरदार फटकेबाजी केली. अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर चौकार मारत त्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. यावेळी त्याने 10 चौकार मारले होते. म्हणजेच 40 धावा या फक्त चौकार मारून कमवल्या होत्या. त्यामुळे अर्धशतकी खेळी करणं शक्य झालं. यशस्वी जयस्वालने पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या 6 चेंडूत त्याने 14 धावा काढल्या. यात तीन चौकारांचा समावेश होता.
दरम्यान, झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान टीम इंडिया सहज गाठेल असंच चित्र आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया मालिकेत 3-1 ने आघाडी घेईल आणि मालिकाही खिशात टाकेल. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिलीच मालिका जिंकेल. दरम्यान आजचा सामना जिंकला तर रविवारी होणार सामना हा फक्त औपचारिक असणार आहे.
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद