टी-20 वर्ल्ड कप झाल्यावर टीम इंडिया आणि झिम्बाव्बे यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. आज तिसरा सामना सुरू असून टीम इंडियामध्ये संपूर्ण वर्ल्ड कपवर बेंचवर बसलेल्या यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. कॅप्टन शुबमन गिलसोबत सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने 36 धावांची दमदार खेळी केली. यशस्वीला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही पण त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद आहे. जगातील फक्त पाच खेळाडूंना हा रेकॉर्ड करता आलाय.
यशस्वी जयस्वाल याने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 500 धावा केल्या आहेत. यशस्वीचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा अधिक असून अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे. या यादीमध्ये सूर्यकुमार यादव हा पहिल्या स्थानावर आहे. सूर्या 167.74 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो, दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा फिल सॉल्ट 165.11 च्या स्ट्राईक रेटने, तर तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल 163.70, चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड 162.75 आणि 161.93 स्ट्राईक रेटसह पाचव्या स्थानी यशस्वी जयस्वाल आहे.
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत टीम इंडियासाठी 17 सामन्यांमध्ये 33.46 च्या सरासरीने 502 धावा केल्या आहेत. यामध्ये यशस्वीने एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. झिम्बाव्बेविरूद्धच्या उर्वरित तीन सामन्यांमध्ये यशस्वीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मात्र आजच्या सामन्यात त्याला 36 धावांवर माघारी जावं लागलं. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 182-4 धावा केल्या आहेत. कॅप्टन शुबमन गिल याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर रुतुराज गायकवाड याने 49 धावा केल्या.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा