मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामधील तीन सामन्यांची वन डे मालिका सुरू झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू झाला आहे. टीम इंंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला एकमेक कसोटी सामन्यात पछाडल्यानंतर आत वन डे मालिकेतही पराभवाचा धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आजचा वन डे सामना कुठे पाहता येईल सविस्तर जाणून घ्या.
IND w vs AUS w मधील पहिला वन डे सामना कधी आणि कुठे?
पहिला वन डे सामना 28 डिसेंबरला मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
INDW विरुद्ध AUSW पहिला वनडे किती वाजता सुरू होईल?
INDW विरुद्ध AUSW पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
INDW विरुद्ध AUSW 1ला ODI सामना ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?
जिओ सिनेमावर INDW विरुद्ध AUSW पहिल्या एकदिवसीय सामना पाहू शकता. मोबाईलवर जिओ सिनेमावर हा सामना फुकटात पाहू शकता.
वन डे मालिकेसाठी संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीप), रिचा घोष (WK), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, हरलीन देओल
वन डे मालिकेसाठी संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (WK), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी