ind w vs eng w | टीम इंडियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान, पाटलांच्या पोरीसमोर इंग्लंडने टेकवले गुडघे

| Updated on: Dec 10, 2023 | 8:54 PM

IND w vs ENG w : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं असून श्रेयांका पाटील हिने दमदार गोलंदाजी केली.

ind w vs eng w | टीम इंडियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान, पाटलांच्या पोरीसमोर इंग्लंडने टेकवले गुडघे
Follow us on

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू असून वुमन्स इंग्लंड संघाने 20 ओव्हरमध्ये 126 धावा केल्या आहेत. इंग्लंड संघाकडून कॅप्टन हीदर नाइट हिने सर्वाधिक 52 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून श्रेयांका पाटील आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकण्यासाठी 127 धावा करायच्या आहेत.

इंग्लंड संघाची आजही एकदम खराब सुरूवात झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये रेणुका सिंह ठाकूरने बौचियर याला शून्यावर आऊट करत पहिला झटका दिला. आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये परत एकदा रेणुकाने सोफिया डंकले हिला 11 धावांवर माघारी पाठवलं होतं. अॅलिस कॅप्सी 7 धावांवर मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाली. त्यानंतर एमी जोन्स आणि हीदर नाइट यांच्यात चांगली भागीदारी झाली होती.

सायका इशाक हिने ही जोडी फोडली एमी जोन्सला 25 धावांवर माघारी पाठवलं. त्याच ओव्हरमध्ये डॅनियल गिब्सला शून्यावर इशाकने बोल्ड केलं. बेस हीथ 1 धावा फ्रेया केम्प सोफी एक्लेस्टोन 0 धावा आणि सोफी एक्लेस्टोन या तिघींना श्रेयांका पाटीलने आऊट केलं. एकीकडे  विकेट जात असताने कॅप्टन नाइटने मात्र एक बाजू लावून धरली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारक आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अमनजोत कौरने तिला स्लो बॉलवर कॅचआऊट केलं.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (W), श्रेयंका पाटील, तितस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, हीदर नाइट (C), एमी जोन्स (W), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर