कोलंबो | एसीसी एमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए आमनेसामने आहेत. दोन्ही संघ तब्बल 10 वर्षांनंतर अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. पाकिस्तानने 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियासमोर विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियाकडून साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली.
टीम इंडियासमोर मजबूत टार्गेट असल्याने चांगल्या सुरुवातीचा आशा होती. त्यानुसार साई आणि अभिषेक या दोघांनी टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर 64 रन्सवर टीम इंडियाला पहिला झटका लागला आणि वादाला तोंड फुटलं. अंपायरने साई सुदर्शन याला आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यामुळे आता वाद पेटला आहे. साई सुदर्शन याला नो बॉलवर आऊट दिल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून अंपायरवर केला जात आहे.
साई आणि अभिषेक या दोघांनी टीमला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी 8.2 ओव्हरपर्यंत 64 धावा केल्या. सामन्यातील नववी ओव्हर अर्षद इक्बाल टाकत होता. अर्षदच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर साई सुदर्शन फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. अंपायरने नेहमीप्रमाणे नो बॉल तपासण्याचा निर्णय घेतला. या रिप्लेमध्ये इक्बालचा पाय रेषेच्या आत नसल्याचं दिसून येत आहे.त्यानंतर अंपायरने साईला आऊट जाहीर केलं. साईने 28 बॉलमध्ये 4 फोरच्या मदतीने 29 धावांची खेळी केली.
रिप्लेमध्ये इक्बाल याचा पाय स्पष्टपणे रेषेबाहेर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हा नियमानुसार नो बॉल आहे. नियमानुसार बॉलरच्या पायाचा हिस्सा हा रेषेच्या आत असायला हवा. मात्र तसं या रिप्लेमध्ये काहीच दिसत नाही. त्यानंतरही अंपायरने साईला बाद दिल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
साई सुदर्शन आऊट की नॉट आऊट?
This clearly not out it's no ball . Pakistani are fixer not a new thing . 3rd umpire should be banned . #INDAvPAKA #EmergingAsiaCup2023 pic.twitter.com/76gsrZ8lTf
— Chiikku (@chikku45chiku) July 23, 2023
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, आरएस हंगरगेकर आणि युवराजसिंह डोडिया.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.