IND vs AUS : केएल राहुलची ‘कसोटी’, ऑस्ट्रेलिया ए विरुद्धचा दुसरा सामना कुठे?

| Updated on: Nov 06, 2024 | 11:33 PM

Australia A vs India A 2nd unofficial Test Live Streaming : ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात टीम इंडिया एला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे दुसरा सामना भारतासाठी प्रतिष्ठेचा आहे.

IND vs AUS : केएल राहुलची कसोटी, ऑस्ट्रेलिया ए विरुद्धचा दुसरा सामना कुठे?
Australia A vs India A unofficial Test
Image Credit source: Cricket.com.au
Follow us on

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही प्रतिष्ठेची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 2 अनऑफीशियल टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा 7 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडिया एमध्ये केएल राहुल आणि विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड या सामन्यात भारताचं नेतृत्व करणार आहे. तर नॅथन मॅकस्विनी याच्याकडे ऑस्ट्रेलिया ए च्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

उभयसंघातील सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

केएल राहुलची ‘कसोटी’

दरम्यान या दुसर्‍या सामन्यात खऱ्या अर्थाने केएल राहुल याची ‘कसोटी’ असणार आहे. केएल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे केएलला गमावलेला विश्वास मिळवण्यासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.

गुरुवारपासून अंतिम सामना

दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टसाठी अपडेटेड टीम इंडिया ए : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिककल, रिकी भुई, बाबा इंद्रजित, इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटीयन, प्रसीद कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि केएल राहुल.

ऑस्ट्रेलिया ए टीम : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), सॅम कोन्स्टास, मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली, जोश फिलिप (विकेटकीपर), फर्गस ओ नील, टॉड मर्फी, ब्रेंडन डॉगेट, जॉर्डन बकिंगहॅम, मायकेल नेसर, जिमी पीअरसन, मार्क स्टेकेटी, स्कॉट बोलँड, नॅथन मॅकअँड्र्यू, ऑलिव्हर डेव्हिस आणि कोरी रोचिचिओली.