मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये महाराष्ट्राचा सुपूत्र असलेल्या राजवर्धन हंगरगेकर याने पदार्पण केलं होतं. मूळचा तुळजापूरचा असलेल्या राजवर्धन याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या आयपीएलनंतर आता सुरू असलेल्या (IND A vs PAK A) एमर्जिंग आशिया कपमधील पाकिस्तानविरूद्धच्या साखळी सामन्यामध्ये धडाकेदार कामगिरी केली आहे. पठ्ठ्याने पाच विकेट घेत पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी पाठवला.
टीम इंडियाने A ने पाकिस्तान A संघावर 8 विकेटने विजय मिळवला आहे. साई सुदर्शन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने साकारला आहे. कर्णधार यश धुल नाबाद 21 आणि साई सुदर्शन नाबाद 104 धावांची महत्त्वाची खेळी केली. याआधी राजवर्धन शो पाहायला मिळाला. भावड्याने पाच विकेट घेत पाकिस्तान संघाची फलंदाजीला खिंडार पाडलं होतं. मात्र धोनी त्याला ओळखायला कसा चुकला तर धोनीने याच हंगेरकरला आयपीएलमध्ये फक्त दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली होती. जर त्याला आणखीन संधी मिळाली असती तर त्याची गोलंदाजीची धार आणखीन वाढली असती, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाकडून सैम अयुब आणि साहिबझादा फरहान हे सलामीला आले होते. मात्र राजवर्धन याने एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले होते. चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सॅम अयुब याला कॅप्टन ध्रुव जुरेल याच्या हाती कॅचआऊट केलं.
सॅमला भोपळाही फोडता आला नाही. तर त्यानंतर ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर राजवर्धन याने ओमर यूसुफला पुन्हा यशच्या हाती कॅच आऊट केलं. टीम इंडियाकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. राजवर्धन याने 8 ओव्हरमध्ये 5.20 च्या इकॉनॉमीने 42 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया ए प्लेईंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.
पाकिस्तान ए प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सॅम अयुब, हसीबुल्ला खान, कामरान गुलाम, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि शाहनवाज दहनी.