AUS vs IND: ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 विकेट्स, टीम इंडियाच्या गोलंदांजाचा धमाका

| Updated on: Aug 23, 2024 | 11:45 PM

India vs Australia : टीम इंडियाच्या गोलंदाजांने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 विकेट्स धमाका केला आहे. त्यामुळे तिसरा दिवस हा निर्णायक असा ठरणार आहे.

AUS vs IND: ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 विकेट्स, टीम इंडियाच्या गोलंदांजाचा धमाका
bcci
Image Credit source: bcci
Follow us on

वूमन्स ऑस्ट्रेलिया ए ने टीम इंडिया वूमन्स ए संघाला एकदिवसीय आणि टी 20i मालिकेत पराभूत केलं. त्यानंतर आता उभयसंघात एकमेव अनऑफिशियल कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया विरुद्ध पहिल्या डावात 28 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने या आघाडीसह दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 164 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 7 विकेट्स गमावून 60 ओव्हरमध्ये या धावा केल्या. टीम इंडियाच्या एका गोलंदाजाने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि या सामन्यात तिने एकूण 10 विकेट्स पूर्ण केल्या. तिला तिसऱ्या दिवशी आणखी काही विकेट्स घेण्याची संधी आहे.

आतापर्यंत नक्की काय झालं?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी पहिल्या डावात 212 धावांवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्यात कॅप्टन मिन्नू मणी हीने निर्णायक भूमिका बजावली. मिन्नूने पहिल्या डावात 21 ओव्हर टाकल्या. मिन्नूने या 21 पैकी 2 ओव्हर या मेडन टाकल्या. तर 58 धावांच्या मोबदल्यात 2.76 च्या इकॉनॉमी रेटने तिने 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 2 विकेट्स गमावून 100 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया 112 धावांनी पिछाडीवर होती.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 184 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 28 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसापर्यंत 60 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या या 7 पैकी 5 जणींना एकट्या मिन्नू मणी हीने आऊट केलं.

मिन्नूने दुसऱ्या डावात 20 ओव्हर टाकल्या. मिन्नूने या 20 पैकी 6 ओव्हर या मेडन टाकल्या. तर 47 धावांच्या मोबदल्यात 2.35 च्या इकॉनॉमी रेटने तिने 5 विकेट्स घेतल्या. एकट्या मिन्नूने ऑस्ट्रेलियाला पहिले 4 झटके दिले. त्यानंतर प्रिया मिश्रा हीने ओपनर मॅटलान ब्राउन हीला आऊट केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 5 विकेट गमावल्या. तर ऑस्ट्रेलियाने मॅटलान ब्राउन हीच्या रुपात सहावी विकेट गमावली. मॅटलान ब्राउन ही मिन्नूची पाचवी शिकार ठरली. मिन्नूने यासह दुसऱ्या डावातही 5 विकेट्स पू्र्ण केल्या. तर सायली सातघरे हीने केट पीटरसन हीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती ही 54.2 ओव्हरमध्ये 7 बाद 157 अशी झाली.

‘दस का दम’

त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅडी डार्क आणि लिली मिल्स या जोडीने 7 धावा जोडल्या. त्यासह ऑस्ट्रेलियाचा 60 ओव्हरनंतर 7 आऊट 164 रन्स झाल्या. यासह दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाकडे 192 धावावंर आघाडी आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाला झटपट रोखण्याचं आव्हान असणार आहे. तसेच मिन्नू मणीलाही आणखी काही विकेट्स घेण्याची संधी आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे

वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.

वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.