मुंबई : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 2 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 209 धावांचं आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी तिरुवनंतपुरम येथे दाखल झाले असून सराव सुरु झाला आहे. पण आता दुसरा सामना होणार की नाही? हा प्रश्न समोर आला आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. तिरुवनंतपुरम येथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारीही पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे सामन्यावर तसा काही फरक पडणार नाही. त्यामुळे सामना पूर्ण होईल असंही सांगण्यात येत आहे. पण पावसाने हजेरी लावली तर काही षटकं कमी होण्याची शक्यता आहे. तर दिवसभराचं तापमान 25 डिग्रीपर्यंत असू शकतं.
तिरुवनंतपुरम येथील खेळपट्टी विशाखापट्टणम सारखीच असणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे गोलंदाज तितकी चांगली कामगिरी करतील. तितकं जिंकण्याची संधी अधिक असणार आहे. दुसरीकडे, या मैदानात मोठी धावसंख्या झाली नसल्याचा मागचा रेकॉर्ड सांगत आहे. आतापर्यंत झालेल्या 4 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्या डावात 114 धावा झाल्या आहेत. दोन वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार प्रथम गोलंदाजी करणं पसंत करतील. असं असलं तरी काय निर्णय घ्यावा हे त्या त्या कर्णधारावर अवलंबून असेल.
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड/मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेटकीपर), सीन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, एडम झाम्पा.
भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई/आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.