नवी दिल्ली : भारतानं काल वेस्ट इंडिजचा (Ind vs WI) पराभव करत मोठा विजय मिळवला. भारतीय संघानं तिसरा एकदिवसीय सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 119 धावांनी जिंकला. आणि यासह एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. तिसऱ्या वनडेत धवन, चहल आणि गिल यांची भूमिका भारतासाठी महत्त्वाची होती. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या (3rd ODI) आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा त्यांच्याच भूमीवर पराजय झाला. वेस्ट इंडिजच्या भूमीवर प्रथमच वनडे मालिकेतील सर्व सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले. या ऐतिहासिक मालिका विजयात शुभमन गिलनं (Shubman Gill) महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं नाबाद 98 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय 4 खेळाडूंचा विजयात महत्त्वाचा वाटा होता. दरम्यान, भारतानं पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. याविषयी अधिक जाणून घ्या…
A classy half-century ✨
हे सुद्धा वाचाWatch #WIvIND for FREE on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) ? | ? Scorecard: https://t.co/1ZHNb39QqI pic.twitter.com/7OBQ1fSSbS
— ICC (@ICC) July 27, 2022
भारतीय संघाने अखेर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये इतिहास रचला. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विश्वविक्रमही मोडीत काढला. भारतीय संघानं 2007 नंतर 12व्यांदा द्विपक्षीय वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला.
???? ??????? ???????! ?
Congratulations #TeamIndia on winning the #WIvIND ODI series! ? ?
Over to T20Is now! ? ? pic.twitter.com/kpMx015pG1
— BCCI (@BCCI) July 27, 2022
पावसामुळे अडचणीत सापडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 119 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. भारताच्या डावातील 24 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि सामना 40 षटकांचा करण्यात आला. दुसऱ्यांदा भारतीय डावाची 36 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसानं हजेरी लावली आणि पाहुण्या संघाचा डाव तीन विकेट्सवर 225 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनं वेस्ट इंडिजला 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले. कॅरेबियन संघ अवघ्या 137 धावांत सर्वबाद झाला.
सलामीवीर शुभमन गिलने 98 चेंडूत दोन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीनं नाबाद 98 धावा केल्या. गिलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी होती. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 91 धावा केल्या होत्या. गिलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात 64 धावा, दुसऱ्या वनडेत 43 धावा केल्या. त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुभमन गिलनं शिखर धवन (58) सोबत पहिल्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. शिखर धवननं वनडे कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक झळकावलं. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. अशाप्रकारे त्याच्या एकदिवसीय सामन्यात 800 चौकार पूर्ण झाले आहेत. अशी कामगिरी करणारा तो 9वा भारतीय ठरला आहे. या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा धवन जगातील 22 वा फलंदाज ठरला.