भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक असतो. आज पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना होणार असून भारतीय संघाचे जुने खेळाडू दिसणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीग 2024 च्या पहिल्या हंगामामध्ये भारत आणि पाकिस्तानने धडक मारली आहे. युवराज सिंहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा पराभव करत फायनल गाठली. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या फायनल सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
भारताचा कॅप्टन युवराज सिंह, सुरेश रैना, युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी अर्धशतके केलीत. चौघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 254 धावांचा डोंगर उभारला होता. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघ 168-7 धावा करू शकला. भारताने 86 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. तर पाकिस्तान संघानेही वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता भारत-पाकिस्तान संघ एकमेकांना भिडणार असून फायनलमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संघात युवराज सिंह याचे दोन महत्त्वाचे हुकमी एक्के म्हणजे युसुफ पठाण आणि इरफान पठाण आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात 37 बॉलमध्ये 95 धावांची महत्त्वाची भागीदारी केली होती. इतकंच नाहीतर दोघांनाही अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी केली.
यष्टिरक्षक – रॉबिन उथप्पा (उपकर्णधार), कामरान अकमल.
फलंदाज – शर्जील खान, सुरेश रैना, युसूफ पठाण.
अष्टपैलू – शोएब मलिक, युवराज सिंग, इरफान पठाण (कर्णधार).
गोलंदाज – वहाब रियाझ, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी.
शोएब मलिक, शर्जील खान आणि कामरान अकमल पाकिस्तानच्या या खेळाडूंना संघात स्थान द्या. फायनलमध्ये या खेळाडूंकडून पाकिस्तान संघाला अपेक्षा असणार आहेत. भारताची बॅटींग धुरळा उडवताना दिसत आहे पण सुरेश रैनाकडून अपेक्षित अशी कामगिरी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीत चांगल्या कामगिरीची सर्वांनाच असणार आहे.
भारतीय चॅम्पियन संघ
रॉबिन उथप्पा (WK), युवराज सिंग (C), अंबाती रायडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, आरपी सिंग, नमन ओझा, सौरभ तिवारी, अनुरीत सिंग, राहुल शर्मा