मुंबई | इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा 2 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया विशाखापट्टणम येथे इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. तसेच टीम इंडिया पहिल्या पराभवाचा वचपा घेण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया या सामन्यासह शुक्रवारी आणखी एक सामना खेळणार आहे. अर्थात टीम इंडियाला एकाच दिवशी 2 सामने खेळायचे आहेत. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने एकाच दिवसात 2 सामने खेळण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे.
आता क्रिकेट चाहत्यांना असा प्रश्न पडला असेल की टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने कसे काय असू शकतात? तर ते आपण जाणून घेऊयात. टीम इंडियाचा शुक्रवारी पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध असणार आहे. तर दुसरा सामना हा अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मधील आहे. सध्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सुपर 6 राउंडचा थरार पाहायला मिळत आहे.
टीम इंडियासमोर सुपर 6 राउंडमध्ये नेपाळचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया आतापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून विजयी हॅटट्रिक साजरी केली. त्यानंतर सुपर 6 मधील पहिला सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान होतं. टीम इंडियाने मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. आता टीम इंडियाच्या सिनिअर आणि 19 वर्षांखालील खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहच्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.
नेपाळ अंडर 19 क्रिकेट टीम | देव खनाल (कॅप्टन), अर्जुन कुमल, बिपिन रावल (विकेटकीपर), आकाश त्रिपाठी, गुलसन झा, दीपक डुमरे, दिपक बोहरा, दिपेश कंडेल, सुभाष भंडारी, तिलक भंडारी, आकाश चंद, उत्तम थापा मगर, दुर्गेश गुप्ता, हेमंत धामी, बिशाल बिक्रम केसी आणि दीपक बोहरा.