IND vs WI : यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांचा झंझावात, टीम इंडियाने विजयासह मालिकेत केली 2-2 ने बरोबरी

| Updated on: Aug 12, 2023 | 11:25 PM

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 सामन्यात 2-2 बरोबरी झाली आहे. तिसरा आणि चौथा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत पुनरागमन केलं आहे.

IND vs WI : यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांचा झंझावात, टीम इंडियाने विजयासह मालिकेत केली 2-2 ने बरोबरी
IND vs WI : शुभमन गिल आणि यशस्वी गिल यांच्या आक्रमक खेळीपुढे विंडीज गोलंदाजांची शरणागती
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धचा चौथा टी20 सामना भारताने 9 गडी राखून आपल्या खिशात घातला. या सामन्यात शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचा झंझावात पाहायला मिळाला. पहिल्या गड्यासाठी दोघांनी दीड शतकी भागीदारी केली. इतकंच काय दोघांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. त्यांच्या आक्रमक खेळीपुढे विंडीज बॉलर हतबल दिसून आहे. विकेट घेताना अक्षरश: त्यांनी हात टेकले. चौथ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. आता पाचवा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याच्या खिशात ही मालिका जाणार आहे.

भारताचा डाव

वेस्ट इंडिजने 20 षटकांच्या खेळात 8 गडी गमवून 178 धावा केल्या आणि विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताच्या सलामीच्या अगदी सोपं करून टाकलं. भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी दीड शतकी भागीदारी केली. पाटा विकेट असल्याने वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं आव्हान भारतीय फलंदाजांना सोपं गेलं असंच म्हणावं लागेल. शुभमन गिल 77 धावा करून तंबूत परतला.

वेस्ट इंडिजचा डाव

पाटा पिचवर वेस्ट इंडिज संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.  शाय होप्स आणि शिम्रॉन हेटमायर वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाही.  खरं तर नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजून लागला होता. त्यामुळे 200 पार धावा होतील असा अंदाज होता. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखलं.  शिम्रॉन हेटमायरने 39 चेंडूत 61 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने 3, कुलदीप यादवने 2, तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

वेस्ट इंडिजचा संघ : कायल मायर्स, ब्रँडन किंग, शाय होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिम्रॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, ओडीन स्मिथ, अकील होसैन, ओबेड मॅकॉय

भारताचा संघ : यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार