मुंबई : भारत आणि इग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताच्या वाघांनी 100 धावांनी हा सामना जिंकला आहे. वर्ल्ड कपमधील भारताचा हा सलग सहावा विजय असून सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने आपलं स्थान पक्क केलं आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 229 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग भारताच्या गोलंदाजांनी 129 धावांवर इंग्लंड संघाचा गाशा गुंंडाळला आहे. भारताकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक चार तर जसप्रीत बुमराह याने तीन विकेट घेतल्या. या पराभवाबाब बोलताना इंग्लंड संघाच्या कर्णधाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही एकदम खराब प्रदर्शन केलं असून 230 धावांचा पाठलाग करताना परत एकदा आम्ही त्याच चुका केल्या. दव येणार की नाही याबाबत काहीच कल्पना नव्हती. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मला दबाव कमी करायचा होता आणि मोठी भागीदारी करायची होती. कारण स्कोरबोर्डचा कसलाच दबाव आमच्यावर नव्हता, मात्र संघातील टॉपचे खेळाडू त्यांचं बेस्ट देण्यात कमी पडत असल्याचं जोस बटलर याने म्हटलं आहे.
दरम्यान, आजच्या विजयासह भारताने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कारण इंग्लंडसारख्या तगड्या संघाला २३० धावांचं लक्ष्य काही मोठं नव्हतं. भारताच्या वाघांनी अवघ्या 129 धावांवर गुंडाळत भारताने सहावा विजय मिळवला.
आजच्या सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड