वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहेत. आता अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर श्रीलंकेला काठावरची संधी आहे. असं असताना 26 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तान हे कसोटी सामना खेळणार आहेत. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर प्रभाव टाकणार आहे. भारताला विजय खूपच महत्त्वाचा आहे. तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र त्यांच्या विजयाने गुणतालिकेत मोठा उलटफेर होऊ शकतो. बॉक्सिंग डे कसोटीत भारत-ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान-दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरला सकाळी 5 वाज सामना सुरु होणार आहे. साडे चार वाजता नाणेफेकीचा कौल होईल. या सामन्याचा दिवस दुपारी 12 वाजेपर्यंत संपणार आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात त्यानंतर कसोटी सामना सुरु होईल. पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. पहिल्यांदा टी20 मालिकेत, त्यानंतर वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेला व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान कसोटी सामन्यातही उलथापालथ करू शकते. जर पाकिस्तानने दोन्ही कसोटीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं तर अंतिम फेरीचं स्वप्न भंगू शकते. दुसरीकडे, श्रीलंकेला काठावरची संधी मिळण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत दक्षिण अफ्रिकेचा संघ टॉपला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाण्याऱ्या दोन पैकी एका कसोटी सामन्यात विजय मिळवला की अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताविरुद्ध दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. तिसऱ्या स्थानावर भारतीय संघ आहे. भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी आहे. पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डे नाईट कसोटीत पुनरागमन करत सामना खिशात घालत बरोबरी केली. तर तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला.