Ind vs Afg Final 2023 Asian Game : भारताचा टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय, कोण जिंकणार ‘सुवर्ण’?

| Updated on: Oct 07, 2023 | 12:21 PM

IND vs AFG Final 2023 : एशियन गेममध्ये सुवर्णपदक जिंकण्यापासून भारतीय क्रिकेट संघ एक पाऊल दूर आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील फायनल सामन्यामध्ये कोण बाजी मारत पहिलं सुवर्णपदक जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ind vs Afg Final 2023 Asian Game : भारताचा टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय, कोण जिंकणार सुवर्ण?
Follow us on

मुंबई : एशियन गेम्सच्या फायनलमधील भारत आणि अफगाणिस्तान सामना (India vs Afghanistan, Final) काही वेळात सुरू होणार आहे. फायनल सामन्याचा टॉस भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज याने जिंकला असून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने बांगलादेशला तर अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. आजच्या सामन्यात विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

शुक्रवारी सेमी फायनलचे दोन सामने झाले, यामधील पहिला सामना भारत आणि बांगलदेशमध्ये झाला. बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 97 धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाने हे आव्हान अवघ्या 10 ओव्हर पूर्ण होण्याच्या आतमध्ये पूर्ण केलं. यामध्ये तिलक वर्मा याने आक्रमक अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीमध्ये वर्माने सहा षटकार मारले होते.

दुसरा  सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला, या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला. पाकिस्तान संघाचा डाव अवघ्या 115 धावांवर आटोपला होता. अफगाणिस्तान संघाने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण करत फायनल सामन्यामध्ये धडक मारली होती. आता फायनलमध्ये कोणता संघ विजय मिळवत सुवर्ण पदकावर आपलं नाव करतो हे सामन्याच्या निकालानंतर समोर येईल.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (W), नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदिन नायब (C), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, जहिर खान

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड (C), टिळक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (W), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग