Ind vs AFG Live Score World Cup 2023 | भारताचा अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय

| Updated on: Oct 12, 2023 | 7:17 AM

Ind vs AFG Live Score World Cup 2023 ODI Updates | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धचा दुसरा सामना जिंकला आहे. स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. अफगाणिस्तानला 8 गडी राखून पराभूत केलं आहे.

Ind vs AFG Live Score World Cup 2023 | भारताचा अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय
Follow us on

नवी दिल्ली | वनडे वर्ल्ड कप 2023 मधील नवव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध जिंकून विजयी वाटचाल सुरु ठेवण्याचा मानस टीम इंडियाचा आहे. तसेच टीम इंडिया मोठ्या फरकाने विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उडी घेण्याच्या प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला उलटफेर करत अफगाणिस्तान विजय मिळवण्याचा प्रयत्नात आहे. रोहित शर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. तर हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे अफगाणिस्तानची सर्व सूत्र आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 11 Oct 2023 09:02 PM (IST)

    IND vs AFG Live Score : भारताचा अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय, नेट रनरेटमध्ये फायदा

    भारताने अफगाणिस्तान विरुद्धचा सामना 8 गडी राखून जिंकला. अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमवून 272 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 2 गडी गमवून सहज पूर्ण केलं. रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हा विजय सोपा झाला. आता भारताचा पुढचा सामना 14 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत आहे.

  • 11 Oct 2023 08:26 PM (IST)

    IND vs AFG Live Score : रोहित शर्माच्या रुपाने भारताला दुसरा धक्का

    भारतीय कर्णधार रोहित शर्मा 131 धावा करून तंबूत परतला आहे. राशिद खानच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.


  • 11 Oct 2023 08:23 PM (IST)

    IND vs AFG Live Score : भारताच्या 1 बाद 200 धावा, रोहित-विराट जोडी मैदानात

    अफगाणिस्ताने विजयासाठी दिलेल्या 272 धावांचं आव्हान गाठताना रोहित शर्मा याने दमदार सुरुवात केली. शतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला.

  • 11 Oct 2023 07:58 PM (IST)

    IND vs AFG Live Score : भारताला इशान किशनच्या रुपाने पहिला धक्का

    इशान किशन 47 धावा करून तंबूत परतला आहे.

  • 11 Oct 2023 07:48 PM (IST)

    IND vs AFG Live Score : रोहित शर्मा याचं वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सातवं शतक

    भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. 63 चेंडूत 100 धावा ठोकल्या.

  • 11 Oct 2023 07:25 PM (IST)

    IND vs AFG Live Score : रोहित शर्मा आणि इशांत किशन यांची शतकी भागीदारी

    रोहित शर्मा याचे 79 आणि इशान किशनने 14 धावा करत शतकी भागीदारी केली आहे. यात काही वाइड आणि नो बॉलच्यचाही धावा आहेत.

  • 11 Oct 2023 07:11 PM (IST)

    IND vs AFG Live Score : रोहित शर्मा षटकारांचा ‘बादशहा’

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याने सर्वाधिक 554 सिक्स मारले आहेत. यासह रोहित सर्वाधित सिक्स मारणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. पहिल्या स्थानी रोहित शर्मा 554, ख्रिस गेल 553, शाहिद आफ्रिदी 473

  • 11 Oct 2023 07:07 PM (IST)

    IND vs AFG Live Score : रोहित शर्माचं अर्धशतक

    रोहित शर्मा याने 30 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.  अर्धशतक होताच रोहितने सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आपल्या नावाव केला आहे.

  • 11 Oct 2023 07:04 PM (IST)

    IND v AFG Live Update : रोहित शर्मा सर्वाधिक सिक्स मारण्यापासून एक पाऊल दूर

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीमध्ये रोहित शर्मा याने ख्रिस गेल याच्या विक्रमाची बरोबरी  (५५३ सिक्स) केलीये. रोहित शर्माने एक सिक्स मारला हिटमॅन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

  • 11 Oct 2023 06:30 PM (IST)

    IND vs AFG Live Score : भारताच्या डावाला सुरूवात

    भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात उतरले आहेत. पहिल्या सामन्यात दोघेही शून्यावर बाद झाले होते. या सामन्यामध्ये दोघांना मोठी संधी आहे.

  • 11 Oct 2023 06:01 PM (IST)

    Ind vs AFG match live score | 50 ओव्हरमध्ये 272 / 8

    अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 272 धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी 273 धावा करायच्या आहेत.  भारतीय फलंदाजांपुढे अफगाणिस्तानच्या स्पिनर्सचं आव्हान असणारआहे.

  • 11 Oct 2023 05:56 PM (IST)

    Ind vs AFG match live score | राशिद खान आऊट

    नवी दिल्ली | अफगाणिस्तानने आठवी विकेट गमावली आहे. राशिद खान 12 बॉलमध्ये 16 धावा करुन आऊट झाला. कुलीदप यादव याने राशिदचा सुंदर कॅच घेतला.

  • 11 Oct 2023 05:38 PM (IST)

    Ind vs AFG match live score | मोहम्मद नबी आऊट

    नवी दिल्ली | जसप्रीत बुमराह याने  नजीबुल्लाह झद्रान याच्यानंतर मोहम्मद नबी याला आऊट करत एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या.

  • 11 Oct 2023 05:34 PM (IST)

    Ind vs AFG match live score | नजीबुल्लाह झद्रान स्वस्तात माघारी

    नवी दिल्ली | जसप्रीत बुमराह याने नजीबुल्लाह झद्रान याचा स्वस्तात कार्यक्रम आटोपला आहे. बुमराहने  नजीबुल्लाह झद्रान याला 2 धावांवर विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 11 Oct 2023 05:27 PM (IST)

    India vs Afghanistan cricket live score | हशमतुल्लाह शाहिदीला रोखलं, कुलदीपकडून शिकार

    नवी दिल्ली | कुलदीप यादव याने हशमतुल्लाह शाहिदी याला 80 धावांवर आऊट करत शतक करण्यापासू रोखलंय. कुलदीपने हशमतुल्लाह याला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

  • 11 Oct 2023 04:46 PM (IST)

    IND vs AFG Live Score | अझमतुल्लाह ओमरझई आऊट

    नवी दिल्ली | हार्दिक पंड्या याने सेट जोडी फोडत अफगाणिस्तानला चौथा झटका दिलाय.  हार्दिकने अझमतुल्लाह ओमरझई याला 62 धावांवर क्लिन बोल्ड केलं.

  • 11 Oct 2023 04:38 PM (IST)

    IND vs AFG Live Score | अझमतुल्लाहनंतर हशमतुल्लाहचं अर्धशतक

    नवी दिल्ली | ठराविक अंतराने 3 विकेट्स गमावल्यानंतर अफगाणिनस्तानच्या अझमतुल्लाह आणि हशमतुल्लाह या जोडीने वैय्क्तिक अर्धशतकं ठोकली आहेत. अझमतुल्लाहनंतर हशमतुल्लाह याने अर्धशतक पूर्ण केलंय.

  • 11 Oct 2023 03:16 PM (IST)

    IND vs AFG Live Score | शार्दुलची पहिली शिकार, अफगाणिस्तानला तिसरा झटका

    नवी दिल्ली | शार्दुल ठाकुर याने अफगाणिस्तानला तिसरा झटका देत पहिली विकेट घेतली आहे. शार्दुलने रहमत शाह याला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

  • 11 Oct 2023 03:08 PM (IST)

    IND vs AFG Live Score | रहमानुल्लाह गुरुबाज आऊट

    नवी दिल्ली | हार्दिक पंड्या याने अफगाणिस्तानला दुसरा झटका देत पहिली विकेट घेतली आहे. हार्दिकने रहमानुल्लाह गुरुबाजला 21 धावांवर आऊट केलं. बाउंड्री लाईनवर शार्दुलने शानदार कॅच घेतला.

  • 11 Oct 2023 02:35 PM (IST)

    IND vs AFG Live Score | बुम बुम बुमराह, अफगाणिस्तानला पहिला धक्का

    नवी दिल्ली | जसप्रीत बुमराह याने अफगाणिस्तानला पहिला झटका दिलाय. बुमराहने इब्राहीम झद्रान याला 22 धावांवर विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 11 Oct 2023 02:10 PM (IST)

    IND vs AFG Live Updates | अफगाणिस्तानची बॅटिंग सुरु, सलामी जोडी मैदानात

    नवी दिल्ली | अफगाणिस्तानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  रहमानुल्लाह गुरुबाज आणि रहमानुल्लाह गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 11 Oct 2023 02:01 PM (IST)

    IND vs AFG Live Updates | दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन

    नवी दिल्ली | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आपण दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन पाहुयात.

    टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

    अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

     

  • 11 Oct 2023 01:08 PM (IST)

    IND vs AFG Live Updates | थोडयाच वेळात टॉस

    नवी दिल्ली | टीम इंडिया-अफगाणिस्तान सामन्याचा टॉस 1 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.  या सामन्यात टॉस निर्णायक भूमिका बजावणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 11 Oct 2023 12:37 PM (IST)

    IND vs AFG Live Updates | टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात वरचढ कोण?

    नवी दिल्ली | टीम इंडिया अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 3 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत राहिला आहे.

  • 11 Oct 2023 12:30 PM (IST)

    IND vs AFG Live Updates | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने

    नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील नववा सामना हा 11 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियामोर अफगाणिस्तानचं आव्हान आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता टॉस होणार आहे.