भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. भारताला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. फलंदाजीत भारतीय संघ निष्फळ ठरला. तर विकेट घेण्यातही हवं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारताला कमबॅकचं प्रेशर वाढणार याची कल्पना रोहित शर्माला होती. त्यामुळे रोहित शर्माने पहिल्याच दिवशी सर्व तोडगे वापरण्याचा प्रयत्न केला. सामना सुरु असताना दोन वेळा लाईट गूल झाली होती. त्यामुळे सामन्यात खोळंबा झाला होता. त्यामुळे गेलेला वेळ भरून काढण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. या अतिरिक्त वेळेचा पुरेपूर फायदा घेण्याचा कर्णधार रोहित शर्माने प्रयत्न केला. शेवटच्या तीन मिनिटात कमबॅकसाठी प्रयत्न केला. पण त्याने वापरलेला तोडगा काही कामी आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला निराश होत तंबूत परतावं लागलं.
पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता संपवणं गरजेचं होतं. लाईट गेल्याने हा खेळ तीन मिनिटांनी वाढवण्यात आला. जेव्हा पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही मिनिटं बाकी होते. तेव्हा रोहित शर्माने षटक आर अश्विनच्या हाती सोपवलं. अचानकपणे आर अश्विनला षटक देण्याचं काम काय कारण? असा प्रश्न अनेकांना पडला. शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज अधिक मारक ठरतात. तरीही आर अश्विनला षटक देण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
फिरकीपटू आपलं षटक पटकन संपवतात. त्यामुळे त्याने त्या तीन मिनिटात दोन षटकं टाकण्यासाठी योजना आखली. आर अश्विनने आपलं षटक पूर्ण केलं आणि शेवटच्या मिनिटात जसप्रीत बुमराहकडे हात सोपवलं. पण अशी युक्ती काही कामी आली नाही. कारण नाथन मॅकस्वीनी आणि मार्नस लॅबुशेन यांची जोडी तग धरून होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कशी कामगिरी होते याकडे लक्ष लागून आहे. पहिल्या दिवसअखेर नाथन मॅकस्वीनीने नाबाद 38, तर मार्नस लाबुशेन नाबाद 20 धावा केल्या आहेत. भारताला एकमेव विकेट मिळाली आणि ती विकेट जसप्रीत बुमराहने घेतली आहे.