मुंबई : बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटचा सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. WTC फायनलमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी भारतासाठी मोठी संधी असणार आहे. मात्र अशातच भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्याआधी मोठी माहिती समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच चौथ्या सामन्यामध्ये मैदानात दिसणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्या कसोटी सामन्याचा टॉस करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानी हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. अँथनी अल्बानी 8 मार्च ते 11 मार्च यादरम्यान भारतीय दौऱ्यावर आहेत. योगायोगाने भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये शेवटचा सामना होणार असल्याने मोदी आणि अल्बानी टॉससाठी येणार असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात होताना दिसत आहे. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मालिकेमध्ये आतापर्यंत दोन्ही संघाच्या स्पिनर्सने आपले एकहाती वर्चस्व ठेवलं आहे. तर फलंदाजीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. कर्णधार रोहित शर्माने एक तर अक्षर पटेलने दोन अर्धशतके केली आहेत. इतर फलंदाजांना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
नरेंद्र मोदी टॉस करणार असल्याचा माहिती समजल्यावर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. काहींनी तर मोदी यांना कर्णधार करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान ते गुजरातचे असल्याने त्यांच्याकडेच भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा द्या असं म्हटलं आहे.
PM Narendra Modi likely to spin the coin tomorrow at the toss of the 4th Test. (Reported by WION).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2023
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.