मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र ग्लेन मॅक्सवेल याने झंझावाती शतक ठोकून ऑस्ट्रेलियाचं मालिकेतील आव्हान कायम राखलं. ऑस्ट्रेलियाने विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची मालिकेतील स्थिती ही 1-2 अशी झाली. त्यामुळे आता मालिकेतील चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे.
टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला कांगारुंचा चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. त्यामुळे या चौथ्या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. हा चौथा टी 20 सामना कधी होणार,टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार, याबाबतची सर्व माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20 सामना हा 1 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20 सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
चौथा टी 20 सामना
𝐇𝐞 𝐂𝐚𝐦𝐞, 𝐇𝐞 𝐒𝐚𝐰, 𝐇𝐞 𝐂𝐨𝐧𝐪𝐮𝐞𝐫𝐞𝐝 👑
Watch Ruturaj Gaikwad in action tomorrow in #INDvAUS 4️⃣th T20I of #IDFCFirstBankT20ITrophy from 6 PM onwards, LIVE on #Sports18, #JioCinema & #ColorsCineplex.#JioCinemaSports pic.twitter.com/CD3RThmQJz
— JioCinema (@JioCinema) November 30, 2023
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20 सामना मोबाईलवर जिओ सिनेमावर फुकटात पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20 सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच कलर्स सिनेप्लेक्स या चॅनेलवर सामना पाहता येईल.
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.