रायपूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका भारताने 3-1 खिशात घातली आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकत भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात मॅक्सवेलच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं होतं. पण चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने भारतात सलग 14 टी20 मालिकेत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच कांगारुंना मालिकेत पराभूत केलं आहे.
भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 जिंकली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 धावा करू शकला. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रवि बिष्णोई यांच्या सर्वोत्तम गोलंदाजीमुळे भारत हा सामना जिंकण्यास यशस्वी ठरला.
रायपूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला आहे. आवेश खान याने बेन द्वारशुइस याला 1 रनवर क्लिन बोल्ड केलं आहे.
रायपूर | ऑस्ट्रेलियाने पाचवी विकेट गमावली आहे. दीपक चाहर याने टीम डेव्हिड याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीमने 19 धावा केल्या.
रायपूर | ऑस्ट्रेलियाने चौथी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल याने बेन मॅकडरमॉट याला क्लिन बोल्ड केलंय.
रायपूर | अक्षर पटेल याने एरोन हार्डी याला आऊट करत कांगारुंना तिसरा झटका दिला आहे. हार्डी याने 8 धावा केल्या.
रायपूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. अक्षर पटेल याने ट्रेव्हिस हेड याला आऊट करत टीम इंडियाची डोकेदुखी मिटवली आहे. हेडने 31 धावा केल्या.
रायपूर | रवी बिश्नोई याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आहे. बिश्नोईने जोश फिलीपी याला 8 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
रायपूर | ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि जोश फिलीपी ही सलामी जोडी मैदानात आली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांची गरज आहे.
रायपूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर चौथा सामना जिंकण्यासाठी 175 रन्सचं टार्गेट ठेवले आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिंकू सिंह याने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
रायपूर | टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावले. मात्र त्यानंतर रिंकू सिंह आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरत स्कोअरबोर्ड हलता-धावता ठेवला. मात्र तनवीर संघा याने ही जोडी फोडून काढली आणि टीम इंडियाला चौथा धक्का दिला. ऋतुराज 32 धावा करुन माघारी परतला.
रायपूर | टीम इंडिया अडचणीत सापडला आहे. यशस्वी, श्रेयस याच्यानंतर आता कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्या अवघी 1 धाव करुन माघारी परतला आहे.
रायपूर | टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 2 विकेट्स गमावले आहेत. यशस्वी जयस्वाल याच्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर 8 धावा करुन माघारी परतला आहे.
रायपूर | आश्वासक सुरुवातीनंतर टीम इंडियाला पहिला धक्का लागला आहे. यशसस्वी जयस्वाल आऊट झाला आहे. एरॉन हार्डी याने यशस्वीला आऊट केलं. यशस्वीने 37 धावांची ताबडतोड खेळी केली.
रायपूर | टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 29 धावांची सलामी भागीदारी केली आहे. यशस्वी 19 आणि ऋतुराज 5 धावांवर नाबाद खेळत आहेत.
रायपूर | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया चौथ्या टी 20 सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. त्यानुसार टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल सलामी जोडी मैदानात आली आहे.
रायपूर | ऑस्ट्रेलियाने चौथ्या टी 20 सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या 5 मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचं आव्हान ठेवतं याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रायपूर | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.
रायपूर | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
रायपूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.