बंगळुरु | टीम इंडिया ने पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. तेव्हा अर्शदीप सिंह याने 3 धावा देत सामना फिरवला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलं होतं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.
बंगळुरु | टीम इंडियाने पाचवी आणि अखेरची टी 20 मॅच जिंकली आहे. श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारदार बॉलिंगच्या जोरावर कांगारुंना 154 धावांवरच रोखलं. अर्शदीप याने 20 व्या ओव्हरमध्ये 10 धावांचा शानदार बचाव केला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 4-1 ने जिंकली.
बंगळुरु | अर्शदीप सिंह याने निर्णायक क्षणी सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलिया कॅप्टन मॅथ्यु वेड याला आऊट केलं. मॅथ्यु वेड 22 धावांवर कॅच आऊट झाला. श्रेयस अय्यर याने वेडचा कॅच घेतला.
बंगळुरु | मुकेश कुमार याने ऑस्ट्रेलियाला सलग 2 झटके दिले आहेत. मुकेशने ऋतुराज गायकवाड याच्या हाती मॅथ्यु शॉर्ट याला कॅच आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर बेन ड्वार्शुइस याला क्लिन बोल्ड केलं.
बंगळुरु | टीम इंडियाला मोठी विकेट मिळाली आहे. अर्धशतक ठोकून आक्रमक फलंदाजी करणाऱ्या बे याने न मॅकडरमॉट याला अर्शदीप सिंह याने रिंकू सिंह याच्या हाती कॅचआऊट केलं आहे. बेन मॅकडरमॉट 54 धावांची खेळी केली.
बंगळुरु | ऑस्ट्रेलियाला चौथा झटका लागला आहे. टीम डेव्हिड 17 धावा करुन आऊट झाला. अक्षर पटेल याने आपल्या बॉलिंगवर आवेश खान याच्या हाती डेव्हिडला कॅच आऊट केलं.
बंगळुरु | टीम इंडियाला तिसरी विकेट मिळाली आहे. रवी बिश्नोई याने एरॉन हार्डी याला आऊट करत कांगारुंना तिसरा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाची 3 बाद 55 अशी स्थिती झाली आहे.
बंगळुरु | रवी बिश्नोई याने टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी दूर केली आहे. रवीने ट्रेव्हिस हेड याला क्लिन बोल्ड करत टीम इंडियाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. हेड 28 धावा करुन आऊट झाला.
बंगळुरु | मुकेश कुमार याने जोश फिलपी याला आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. मुकेशने फिलपीला 4 धावांवर बोल्ड केलं.
बंगळुरु | ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ट्रेव्हिस हेड आणि जोश फिलिपी ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 160 धावांचं आव्हान दिलं आहे.
बंगळुरु | टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर 53 धावा करुन आऊट झाला आहे.
बंगळुरु | टीम इंडियाला पाचवा झटका लागला आहे. जितेश शर्मा 16 बॉलमध्ये 24 धावा करुन आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर हा 5 बाद 97 असा झाला आहे.
बंगळुरु | फिनीशर रिंकू सिंह आऊट झाला आहे. रिंकू 6 धावा करुन मैदानाबाहेर परतला.
बंगळुरु | टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. यशस्वी-ऋतुराज या सलामी जोडीनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 5 धावा केल्या.
बंगळुरु | टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावले आहेत. टीम इंडियाची सलामी जोडी माघारी परतली आहे. यशस्वी जयस्वाल याच्यानंतर ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. यशस्वी 21 आणि ऋतुराजने 10 धावा केल्या.
बंगळुरु | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी 20 सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड सलामी जोडी मैदानात आली आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.
बंगळुरु | पाचव्या आणि अंतिम टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन मॅथ्यु वेड याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिले बॅटिंग करणार आहे.
बंगळुरु | विराट कोहली याच्या सेंकड होम ग्राउंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवा होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.