मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या वनडे सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 277 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन याने नाबाद 58 धावांची खेळी केली. तर शुबमन गिल याने सर्वाधिक 74 धावांचं योगदान दिलं. ऋतुराज गायकवाड याने 71 धावा केल्या. तर सूर्याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय.
मोहाली | कॅप्टन केएला राहुल याने सिक्स ठोकून टीम इंडियाला विजयी केलंय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 277 धावांचं आव्हान टीम इंडियाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
मोहाली | टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. मात्र त्यानंतर कॅप्टन केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी शानदार भागीदारी करत टीम इंडियाला आता विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे.
मोहाली | टीम इंडियाला मोठा झटका लागलाय. ओपनर बॅट्समन शुबमन गिल आऊट झालाय. गिलने 63 बॉलमध्ये 74 धावा केल्या. गिल आऊट झाल्याने टीम इंडियाची 25.3 ओव्हरमध्ये 3 बाद 151 अशी स्थिती झालीय.
मोहाली | टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. ऋतुराज गायकवाड याच्यानंतर श्रेयस अय्यर आऊट झालाय. श्रेयस अय्यर 3 धावांवर रनआऊट झालाय.
मोहाली | एडम झॅम्पाने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. झॅम्पाने ऋतुराज गायकवाड याला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. ऋतुराजने 77 बॉलमध्ये 71 धावांची खेळी केली.
मोहाली | ऋतुराज गायकवाड याने वनडे क्रिकेटमधील पहिलंवहिलं अर्धशतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं आहे. ऋतुराजने 60 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय.
मोहाली | शुबमन गिल याने आपल्या होम पीचवर 37 बॉलमध्ये खणखणीत सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. शुबमनने 143 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलंय.
मोहाली | टीम इंडियाची 277 धावांचं पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल या दोघांनी चांगली सुरुवात केली आहे.
भारताने ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 276 धावांवर गुंडळला, यामध्ये मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
मोहाली | जसप्रीत बुमराह याने जोस इंग्लिसला आऊट करत ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला आहे. बुमराहने जोस इंग्लिसला श्रेयस अय्यर याच्या हाती कॅच आऊट केलं. इंग्लिसने 45 बॉलमध्ये 45 धावा केल्या.
मोहाली | सूर्यकुमार यादव याने नॉन स्ट्राईक एंडवर दाखवलेल्या हुशारीमुळे ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका लागला आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅमरुन ग्रीन याला सूर्यकुमार यादवने पद्धतशीर रन आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मोहाली | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने खेळ थांबला होता. मात्र काही मिनिटांनंतर अखेर पुन्हा खेळाला सुरुवात झालीआहे.
मोहाली | आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाला चौथा झटका देत पहिली विकेट घेतली आहे. अश्विनने मार्नस लबुशेन याला 39 धावांवर आऊट केलं. विकेटकीपर केएल राहुल याने लबुशेनला स्टंपिंग केलं.
मोहाली | मार्नस लबुशेन आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. स्टीव्हन स्मिथ याच्या रुपात ऑस्ट्रेलियाने 112 धावांवर तिसरी विकेट गमावली होती. तिथपासून या दोघांनी ऑस्ट्रेलियाला सावरलंय.
मोहम्मद शमी याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मिचेल मार्श याला तंबूत पाठवलं.
रुतुराज गायकवाड आणि रविचंद्रन अश्विन संघात एन्ट्री केलीय. गायकवाडसाठी ही मोठी संधी आहे तर दुसरीकडे अश्विनला वर्ल्ड कपमधील आपलं स्थान पक्क करण्यासाठी या मालिकेत चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (W), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (C), शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये कर्णधार राहुलने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.