मुंबई :वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसऱ्य वन डे सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाने 190 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींग करताना 50 ओव्हरमध्ये 338-7 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया 148 धावांवर ऑल आऊट झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅशले गार्डनरने सर्वाधिक तीन आणि अॅनाबेल सदरलँड, अलाना किंग आणि मेगन शूट यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने तिन्ही सामने जिंकत टीम इंडियाला व्हाईटवॉश दिलाय. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाही टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 339 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाती सुरूवातच खराब झाली होती. पाचव्या ओव्हरमध्ये पहिला झटक बसला होता. ओपनर यास्तिका भाटिया पाच धावा करून परतली. स्मृती मानधनाने सर्वाधिक 29 धावा केल्या. बाकी कोणत्याची खेळाडूल मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन हरमनप्रीत कौर आजच्याही सामन्यात 3 धावांवर आऊट झाली. तिन्ही वन डे सामन्यांमध्ये हरमनप्रीत फेल गेली. जेमिमा रॉड्रिग्स 25 धावा आणि दीप्ती शर्मा नाबाद 25 धावांवर नाबाद राहिली. यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनजोत कौर आणि पूजा वस्त्राकर यांना मोठी खेळी करता आली नाही.
ऑस्ट्रेलिया संघाकडून फोबी लिचफील्डने 119 धावांची शतकी खेळी केली. तर कॅप्टन अॅलिसा हिलीने 82 धावा केल्या होत्या. लिचफील्डने तिन्ही सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दोघींनी तब्बल 189 धावांची मोठी भागीदारी केली त्यानंतर अॅशले गार्डनर 30 धावा आणि अलाना किंग 26 धावांच्या मदतीने 330 चा टप्पा पार केला. टीम इंडियाकडून श्रेयांका पाटीलने सर्वाधिक तीन तर अमनज्योत कौरने दोन विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, अॅलिसा हिली (W/C), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (W), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग