IND vs BAN : मोहम्मद शमी याचा आग ओकणारा कडक बॉल, बांगलादेशच्या बॅट्समनच्या केल्या दांड्या गुल

| Updated on: Sep 15, 2023 | 7:18 PM

Mohammed Shami Bold : मोहम्मद शमी एक क्लास बॉलर असून त्याला सुपर 4 मधील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघात जागा मिळाली नाही. मात्र पठ्ठ्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत टीम मॅनेजमेंटला विचार करायला भाग पाडलं.

IND vs BAN : मोहम्मद शमी याचा आग ओकणारा कडक बॉल, बांगलादेशच्या बॅट्समनच्या केल्या दांड्या गुल
Follow us on

मुंबई : भारत आणि बांगलादेशमध्ये (IND vs BAN ASIA CUP 2023) सामना सुरू असून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami Bold) आपली ताकद दाखवून दिलीये. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात संधी मिळाल्यावर गड्याने पहिल्याच बॉलवर बांगलादेशचा मेन बॅट्समन लिटन दास याच्या दांड्या गुल केल्या. मोहम्मह शमीने घेतलेल्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. शमी एक क्लास बॉलर असून त्याला सुपर 4 मधील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघात जागा मिळाली नाही. मात्र पठ्ठ्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत टीम मॅनेजमेंटला विचार करायला भाग पाडलं.

पाहा व्हिडीओ- :

 

रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून सलामीला लिटन दास आणि तनझिद हसन उतरले होते. तर आजच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवलेला मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकत होता. शमीला ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार पडला होता. मात्र त्याने परत दुसऱ्याच ओव्हरधील पहिल्याच चेंडूवर कमबॅक केलं. पठ्ठ्याने लिटन दास याचा कडक बोल्ड काढला.

दरम्यान, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 265 धावा केल्या आहेत. यामधये शमीने 8 ओव्हर टाकत 32 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. यामधील एक ओव्हर शमीने मेडर्न टाकली. शमीला संधी न देता सिराजला संधी देण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे मात्र शमी तसा तोडीचा गोलंदाज असून त्याला खाली बसवणं म्हणजे त्याचा आत्मविश्वास कमी केल्यासारखं आहे.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (W), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (W), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा