IND vs BAN : भारताला विजयासाठी इतक्या धावांचं लक्ष्य, गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंना नाचवलं!

| Updated on: Oct 19, 2023 | 6:27 PM

IND vs BAN : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि बांगलादेश संघामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशला चांगली सुरूवात करूनही मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलं नाही. आजही गोलंदांजांनी परत एकादा चमकदार कामगिरी केली.

IND vs BAN : भारताला विजयासाठी इतक्या धावांचं लक्ष्य, गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंना नाचवलं!
Follow us on

मुंबई : भारत आणि बांगलादेशमधील सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार मारा करत बांगलादेशला 256-8 धावांवर रोखलं आहे. बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दास याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताला वर्ल्ड कपमध्ये सलग चौथ्या विजयासाठी 257 धावांचं लक्ष्य असणार आहे.

बांगलादेशचा डाव

बांगलादेश संघाकडून सुरूवातीला लिटन दास आणि तन्झिद हसन उतरले होते. दोघांनी सावध सुरूवात केली होती, एकदा सेट झाल्यावर दोघांनीही गिअर बदलले आणि फटकेबाजी करायला सुरूवात केली. भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवून दिली नव्हती, अखेर कुलदीप यादव याने ही जोडी फोडली. दोघांनी 93 धावांची सलामी दिली होती, मात्र एक विकेट पडल्यानंतर बांगलादेश संघाच्या विकेट पडत गेल्या.

सलामीवीर तन्झिद हसन (51 धावा)  करत अर्धशतक करताच कुलदीचा शिकार ठरला. त्यानंतर शांतो याला जडेजाने ८ धावांवर स्वस्तात माघारी पाठवलं. मेहदी हसन मिराझ (3 धावा), तौहीद ह्रदोय (16 धावा) करून बाद झाले.  मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्ला यांनी भागीदारी करत डावाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत.

मुशफिकुर रहीम (38 धावा) करून बाद झाला त्यानंतर महमुदुल्ला (46 धावा) काढून माघारी परतले. भारताकडून कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनी 2 विकेट घेतल्या. भारताला आज परत एकदा रोहितकडून आक्रमक खेळीची अपेक्षा आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद,  नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम